शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

आजरा कारखाना बिनविरोधला नेत्यांचा विरोधच

By admin | Updated: March 29, 2016 00:18 IST

गोंधळाचे वातावरण : आघाड्या बांधणीवरच ठरणार निवडणुकीतील यशापयश

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा साखर कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा काही मंडळी व्यक्त करीत असली तरी प्रमुख नेतेमंडळींचाच बिनविरोधला विरोध असल्याने आता आघाड्यांच्या बांधणीवरच निवडणुकीतील यशापयश ठरणार, हे स्पष्ट होत आहे.गडहिंग्लज साखर कारखान्याची रणधुमाळी आता शांत झाली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांसह नेतेमंडळींचे लक्ष आजरा साखर कारखान्याकडे केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँगे्रस हे एकत्र राहणार हे स्पष्टच आहे, तर प्रबळ विरोधक म्हणून अशोक चराटी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना-भाजप असे चित्र पहिल्या टप्प्यात दिसत आहे. कदाचित यामध्ये बदलही होऊ शकतो.अशोक चराटी, जयवंतराव शिंपी, श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचे निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्यांचे चाचपणी मेळावे पार पडले. यामध्ये केवळ अंजनातार्इंनी बिनविरोधबाबत भाष्य केले, तर अशोकअण्णा यांच्या मेळाव्यात बिनविरोध नकोच, चांगल्या कार्यकर्त्यांना त्यामुळे संधी मिळत नाही, अशी उघड भूमिका जिल्हा दूध संघाचे संचालक रवींद्र आपटे यांनी घेऊन बिनविरोधचा ‘चराटी’ यांच्या गटाकडून मुद्दा निकालात काढला आहे.सत्तारूढ मंडळींमध्ये आता एकंदर परिस्थिती पाहिली तर मनोमिलन होणे अशक्य आहे. याशिवाय जिल्हा बँक, जनता बँक, तालुका खरेदी-विक्री संघ निवडणुकीतही अनेकांना ‘कारखान्याचे’ गाजर दाखवून त्या-त्यावेळी शांत केले आहे. अशी मंडळीही बिनविरोध हा प्रकार बाजूला ठेवण्याच्या सूचना नेत्यांना करू लागली आहेत. बिनविरोधच्या नादात कार्यकर्ते दुखावण्याचा धोकाही समोर आहे.कारखाना निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असली तरी ती विरोधकांना बंधनकारक निश्चितच असणार नाही. सध्या असणाऱ्या गटामध्ये जयवंतराव शिंपी, भाजप, श्रमिक मुक्ती दल यांनाही बऱ्यापैकी प्रतिनिधित्व द्यावे लागणार आहे.सगळेच गोंधळाचे वातावरण असल्याने बिनविरोधी केवळ चर्चाच राहील आणि उमेदवारांची संख्या मात्र विक्रमी असेल, असेच दिसत आहे.