शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 18:05 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने रविवारी उघडीप दिली. शहरात काही काळ पावसाच्या हलक्या सरी वगळता खडखडीत ऊन पडले. पावसाची उघडीप असली तरी राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत अंशत: वाढ होऊन सायंकाळी ती १६ फुटांवर पोहोचली.गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. शनिवारी (दि. ५) तर पावसाने उघडीप दिली. ...

ठळक मुद्देधरणक्षेत्रातील विसर्गामुळे पंचगंगेच्या पातळीत अंशत: वाढराधानगरी धरण ९८ टक्के भरलेजिल्ह्यात ४२.१५ मिलिमीटर पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने रविवारी उघडीप दिली. शहरात काही काळ पावसाच्या हलक्या सरी वगळता खडखडीत ऊन पडले. पावसाची उघडीप असली तरी राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत अंशत: वाढ होऊन सायंकाळी ती १६ फुटांवर पोहोचली.

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. शनिवारी (दि. ५) तर पावसाने उघडीप दिली. शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून शनिवारी तो १८०० क्युसेक प्रतिसेकंद करण्यात आला. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत अंशत: वाढ झाली. रविवारी सकाळी आठपर्यंत गेल्या चोवीस तासांत ४२.१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

राधानगरी धरण ९८ टक्के भरले आहे. काळम्मावाडी (दूधगंगा) धरण ८३ टक्के भरले आहे. तसेच वारणा धरण ९१ टक्के भरले असून, येथून १६०६ क्युसेक प्रतिसेकंद विसर्ग सुरू राहिला. अद्याप पंचगंगा नदीवरील रुई, इचलकरंजी, शिंगणापूर व भोगावती नदीवरील खडक-कोगे हे बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यात ४२.१५ मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत रविवारी सकाळी आठपर्यंत ४२.१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये गगनबावडा तालुक्यात ११.०० मि.मी., राधानगरीमध्ये ३.३३ मि.मी., चंदगडमध्ये ३.०० मि.मी., आजºयामध्ये २.०० मि.मी., कागलमध्ये ०.१४ मि.मी., शाहूवाडीत ११.०० मि.मी., भुदरगडमध्ये ३.०० मि.मी., हातकणंगलेमध्ये २.१२ मि.मी., शिरोळमध्ये निरंक, पन्हाळ्यात ३.८५ मि.मी., करवीरमध्ये २.००, गडहिंग्लजमध्ये ०.७१ मि.मी. पाऊस पडला आहे.