शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हाणामारीमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा उघड

By admin | Updated: October 29, 2015 00:47 IST

महेश जाधव यांची टीका : पराभव दिसू लागल्यानेच लाटकरांचा तोल ढळला

कोल्हापूर : शिवाजी पार्कसारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये टोळकी घेऊन मारामारी करण्याची प्रवृत्ती घातक स्वरूपाची आहे. अनेक गुन्हे दाखल असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना महापालिकेत प्रवेश देणे धोक्याचे ठरेल. हाणामारीमुळे या पक्षाचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी केली. भाजप-ताराराणी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी यशवंत लॉन येथे मंगळवारी (दि. २७) आयोजित विशेष प्रचारसभेत ते बोलत होते. महेश जाधव पुढे म्हणाले, ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, अशा राजू लाटकर यांनी, शिवाजी पार्कसारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये हाणामारीसारखे घृणास्पद प्रकार केले. महापालिका निवडणुकीतील स्वत:चा आणि पक्षाचा पराभव ठळकपणे दिसू लागल्यानेच त्यांचा तोल ढळला आहे. त्यामुळेच ते अशा गोष्टी करीत आहेत. आता सर्वसामान्यांनीच अशा घातक प्रवृत्तीला दूर लोटण्यासाठी भाजप-ताराराणी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाचे शहराध्यक्षच हाणामारी करीत असतील तर एरव्ही त्यांची किती दहशत असेल याची कल्पनाच केलेली बरी, असा टोलाही जाधव यांनी लगावला. शहर आणि प्रभागातील ही गुंडगिरी संपविण्यासाठी तसेच असली प्रवृत्ती संपवून परिस्थिती बदलण्यासाठी सुवर्णा साळोखे, संजीवनी शेटे, संगीता सावंत, शोभा बामणे यांच्यासह भाजप-ताराराणी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन महेश जाधव यांनी केले. यावेळी सभेला अशोक देसाई, हेमंत आराध्ये यांच्यासह साळोखेनगर, कळंबा फिल्टर हाऊस, देवकर पाणंद, तपोवन, राजलक्ष्मीनगर या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.