शहरं
Join us  
Trending Stories
1
"कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
5
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
6
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
7
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
8
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
9
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
10
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
11
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
12
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
13
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
14
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
15
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
16
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
17
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
18
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
19
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
20
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   

‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस-२०१५’चे आज उद्घाटन

By admin | Updated: February 27, 2015 23:22 IST

गृहस्वप्नाच्या पूर्ततेची सुवर्णसंधी : पुणे, कोल्हापुरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग

कोल्हापूर : स्मार्ट सिटी, विद्यानगरी असलेले पुणे व कलानगरी असलेल्या कोल्हापुरातील गृहस्वप्नांची पूर्तता करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र व गोव्यामध्ये अग्रणी असलेल्या ‘लोकमत’ समूहाने ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस - २०१५’ या प्रदर्शनाद्वारे उपलब्ध करून दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या व भव्य अशा या गृहप्रदर्शनाचे आज, शनिवारी सकाळी साडेदहा वाजता हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी ‘क्रिडाई’ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजीव परिख, ‘क्रिडाई’ कोल्हापूरचे अध्यक्ष गिरीश रायबागे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.प्रदर्शन आज, शनिवारी व उद्या, रविवारी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. यात पुणे, कोल्हापुरातील नामांकित व आघाडीचे बांधकाम व्यावसायिक त्यांचे नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करणार आहेत. स्वत:ला हवे तसे आणि मनासारखे घर पाहण्यासाठी विविध परिसरांत फिरावे लागते, धावपळ होते. ही ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन आयोजित केलेल्या या प्रदर्शनात ‘एकाच छताखाली’ पुण्यासह कोल्हापुरात सुरू असलेल्या आणि येऊ घातलेल्या गृहप्रकल्पांची सहजपणे माहिती मिळणार आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंत अशा सर्वस्तरांतील ग्राहकांसाठी घर निवडण्याचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. ‘वन बीएचके’पासून प्रीमियम लक्झुरिअस फ्लॅट, रो हाऊस, बंगलो, फ्लॅटपर्यंत तसेच पुणे आणि कोल्हापुरातील व्यावसायिक मिळकतींचे प्रकार येथे पाहता येतील. कोल्हापूरकरांना त्यांच्या परिसरातील, गृहप्रकल्पांची माहिती मिळणार आहे. स्वप्नातील घराची पूर्तता करण्याची सुवर्णसंधी ‘लोकमत’ने या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या प्रदर्शनानिमित्त मिळणाऱ्या विशेष सवलतीतील दरांचाही फायदा ग्राहकांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)तासाला जिंका चांदीची नाणी!हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी प्रत्येक तासाला एक ‘लकी ड्रॉ’ काढण्यात येणार आहे. त्यातील भाग्यवान विजेत्यांना चांदीची नाणी दिली जाणार आहेत.सहभागी बांधकाम व्यावसायिककोल्हापुरातील व्यावसायिक : वेदार्जुन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, रायसन्स कन्स्ट्रक्शन्स, मिरजे इस्टेट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इम्राल्ड प्रॉपर्टीज, कुराडे बिल्डर्स, क्रिडाई - इचलकरंजी, प्रतीक टाऊनशिप अ‍ॅण्ड इन्फ्रा प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड, निवारा निर्माण डेव्हलपर्स, रामसिना ग्रुप, पूजा बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड, एस. ए. मगदूम प्रमोटर्स अ‍ॅण्ड बिल्डर्स. पुण्यातील व्यावसायिक : भंडारी असोसिएटस, द स्केपर्स इन असोसिएशन विथ जी. मित्तल अ‍ॅण्ड सन्स, कोठारी ब्रदर्स, त्रिमूर्ती ग्रुप, सुमेरू डेव्हलपर्स, सिटी कॉर्पोरेशन, श्री मंगल प्रोजेक्टस, दरोडे-जोग प्रॉपर्टीज, सिद्धिविनायक ग्रुप्स, नाईकनवरे डेव्हलपर्स, स्काय आय डेव्हलपर्स, डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स, श्री व्यंकटेश बिल्डकॉन, मॅपल शेल्टर, एक्सलन्स शेल्टर, पृथ्वी एडिफाईस.