शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:01 IST

कोल्हापूर : गेल्या सात वर्षांपासून खंडित असलेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग आता खुला झाला आहे. रविवारी दुपारी मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे ‘एअर डेक्कन’चे चार्टर विमान दाखल झाले. त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. वॉटर शॉवर (पाण्याचे फवारे)ने सलामी देऊन या विमानाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. २० ते २२ एप्रिल दरम्यान विमानसेवेचे रीतसर ...

कोल्हापूर : गेल्या सात वर्षांपासून खंडित असलेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग आता खुला झाला आहे. रविवारी दुपारी मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे ‘एअर डेक्कन’चे चार्टर विमान दाखल झाले. त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. वॉटर शॉवर (पाण्याचे फवारे)ने सलामी देऊन या विमानाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. २० ते २२ एप्रिल दरम्यान विमानसेवेचे रीतसर उद्घाटन होईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.बहुप्रतीक्षित कोल्हापूर-मुंबई विमानसेवा केव्हा सुरू होते, याकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष होते. यासाठी खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे यांचा दिल्लीदरबारी पाठपुरावा सुरू होता. त्याला यश येऊन या विमानसेवेचा मार्ग खुला झाला आहे. याच्या चाचणीसाठी रविवारी दुपारी तीन वाजता उजळाईवाडीच्या कोल्हापूर विमानतळावर ‘एअर डेक्कन’चे अठरा आसनी चार्टर विमान दाखल झाले. धावपट्टीवर दोन्ही बाजूंना स्वागतास सज्ज असलेल्या अग्निशमन बंबांतून पाण्याच्या फवाऱ्याने सलामी देऊन या विमानाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी विमानातून आलेले भारतीय विमानतळ प्राधिकरणचे सिव्हिल मॅनेजर राजेश अय्यर, फेस्ट आॅफिसर नवीन के., पश्चिम विभागाचे इंजिनिअरिंंग जनरल मॅनेजर एस. के. व्यवहारे, एअर डेक्कनच्या केबिन क्रू उमा पांडे, कॅप्टन अ‍ॅँड्री व्ही. यांचे खासदार महाडिक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व कोल्हापुरी फेटा बांधून स्वागत करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर विमानतळाच्या व्यवस्थापिका पूजा मूल, कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य समीर सेठ, गोकुळ दूध संघाचे संचालक रामराज कुपेकर, इंद्रजित जाधव, आदी प्रमुख उपस्थित होते.विमान उड्डाणाची चाचणी यशस्वी होऊन दुपारी चारच्या सुमारास या विमानाने पुन्हा मुंबईकडे उड्डाण केले. आणखी पुढील चार दिवस ही चाचणी सुरू राहणार आहे.खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूरची विमानसेवा २०११ पासून बंद झाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण कोल्हापूरची विमानसेवा लवकरच सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार गेल्या चार वर्षांत आपण पाठपुरावा सुरू ठेवला. त्याचबरोबर केंद्रीय विमान उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे यासाठी प्रयत्न केले. यावर प्रभू यांनी ‘एअर डेक्कन’ला यासंबंधी सूचना दिल्या. त्यानुसार विमान उड्डाणाची चाचणी घेण्यात आली. आणखी चार दिवस ही चाचणी सुरू राहून त्यानंतर रीतसर विमानसेवा सुरू होईल. २२ एप्रिलला या विमानसेवेचे रीतसर उद्घाटन होईल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्'ातील खासदार, आमदारांसह लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले जाईल. तसेच केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनाही निमंत्रित केले जाणार आहे.सहा महिन्यांचे तिकीट भाडे भरतो; पण विमान सुरू ठेवाकोल्हापूर-मुंबई विमानसेवा ही सेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत होते की नाही, याबद्दल येथील प्रवाशांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे आर्थिक बाबीची चिंता न करता ‘एअर डेक्कन’ने ही सेवा सुरळीत ठेवावी. आवश्यकता वाटल्यास सहा महिन्यांच्या तिकिटांचे भाडे आपण भरू; पण ही सेवा कायम सुरू राहावी, याची हमी आपण विमान प्राधिकरणाला दिली आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.