शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

आडवेळवाडीतील बंद रस्ता खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2015 00:56 IST

मेढा ग्रामपंचायतीकडून कारवाई : चौघांचा विरोधाचा प्रयत्न हाणून पाडला

म्हापण : आडवेळवाडी येथील बंद केलेला रस्ता अखेर वेंगुर्ला पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मेढा ग्रामपंचायतीने मंगळवारी सायंकाळी ५ वाजता खुला केला. यावेळी हेमंत कोचरेकर, तुळशीदास राऊळ, राजन राऊळ, बाळा राऊळ या चौघांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या विरोधाला न जुमानता रस्ता पूर्ववत करण्यात आला.आडवेळवाडी येथील ग्रामस्थांनी निवती बंदर ते आडवेळवाडीपर्यंतच्या एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा तिसरा टप्पा लोकवर्गणी व श्रमदानाने पूर्ण केला होता; पण काही लोकांनी त्या जमिनीवर आपला हक्क सांगत रस्त्यावर दगडी भिंत उभी करून ५० मीटर रस्ता उखडून टाकला होता. त्या विरोधात तेथील ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर २५ मे रोजी उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, विरोधकांच्या तक्रारीवरून निवती पोलीस ठाण्याचे निरीक्षक जानकर यांनी घटनास्थळी भेट दिली असता तेथील ग्रामस्थांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला व ज्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तेव्हा तुम्ही पोलीस ठाण्यात त्या लोकांविरोधात तक्रार करा, त्यानंतर पुढील कारवाई करता येईल, असे सांगितले. सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या हेमंत राधाकृष्ण कोचरेकर, तुळशीदास गणपत राऊळ, राजन धोंडी राऊळ व बाळा राऊळ यांच्याविरोधात निवती पोलिसांत रात्री तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)जेसीबीच्या सहायाने बांधकाम हटविलेरस्ता २६ नंबरला येत असल्याने वेंगुर्ला तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन रस्ता २६ नंबरला येत असल्याने रस्ता मोकळा करण्यास सांगितले होते. गटविकास अधिकाऱ्यांनी हा रस्ता मेढा ग्रामपंचायतीच्या ताब्यात असल्याने रस्त्यावरील बांधकाम हटवून रस्ता पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण रद्द केले. ग्रामपंचायतीने मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जेसीबीच्या सहायाने रस्त्यावरील भिंत तोडून रस्ता पूर्वस्थितीत आणला. यावेळी मेढा सरपंच आरती कुडाळकर, माजी सरपंच विजय मेतर, ग्रामपंचायत सदस्या धुरी, ग्रामसेवक हळदणकर व आडवेळवाडी व मेढावाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.