शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टी-कोरे समेटाची नुसतीच हवा

By admin | Updated: September 3, 2014 00:14 IST

शाहूवाडीचे राजकारण : भारतअप्पाही लढणार

कोल्हापूर : शाहूवाडी मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार सत्यजित पाटील यांचा पराभव करण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेऊन आमदार विनय कोरे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारतअप्पा पाटील यांच्यात समेट घडवून आणल्याची हवा गेल्या काही दिवसांत शाहूवाडी तालुक्यात व वारणा खोऱ्यात पसरली आहे. असा कोणताही प्रकार झाला नसून, २३ आॅगस्टला मी अमेरिकेला गेलो होतो, आजच भारतात आल्याने ही भेट झाली केव्हा आणि समेट तरी कसा झाला, अशी विचारणा स्वत: खासदार शेट्टी यांनीच केली आहे. दुसऱ्या बाजूला निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे भारतअप्पा पाटील यांनीही जाहीर केले. संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी नव्याने गावोगावी डिजीटल लावून विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.आमदार विनय कोरे हे नुसते राजू शेट्टी यांचेच राजकीय शत्रू नसून ते ऊस आंदोलनाच्या चळवळीचेही शत्रू आहेत. अशा नेत्यांशी एका निवडणुकीत नव्हे, तर उभ्या आयुष्यात कधीच आपला समेट होणार नसल्याची प्रतिक्रिया खासदार शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.ते म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत मी दोन माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांची जपणूक मनापासून केली. त्यामध्ये एक शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील व दुसरे शिराळ््याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक. त्यामुळे त्यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत आपल्याला सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा बाळगण्यात गैर नाही. अफवा... कार्यकर्त्याकर्त्याकडून विचारणाशाहूवाडी मतदारसंघातील लढत निवडणुकीपूर्वीच गाजू लागली आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून सत्यजित पाटील यांना कामाला लागा असा आदेश दिला आहे. त्यांच्या उमेदवारीस खासदार शेट्टी यांचा विरोध आहे. स्वाभिमानीला ही जागा आपल्याला हवी आहे, त्यांच्याकडून सदाभाऊ खोत व भारतअप्पा पाटील यांची नावे चर्चेत आहेत. आमदार कोरे स्वत: जनसुराज्य पक्षातून रिंगणात उतरणार आहेत. त्याशिवाय काँग्रेसचाही उमेदवार रिंगणात असेल. परंतु सध्यातरी कोरे-सत्यजित पाटील व भारतअप्पा यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. भारतअप्पा यांनी या निवडणुकीत माघार घेऊन सावकरांना मदत करावी यासाठी कोरे गटाकडून दबाव आहे. त्यास भारतअप्पा तयार नसल्याने सत्यजित यांना पुढे करून कोरे-शेट्टी व भारतअप्पा यांच्यात समेट झाल्याची हवा मतदारसंघात उठवून देण्यात आली आहे. स्वत: शेट्टी यांनाही मतदारसंघातून त्यासंबंधी आज कार्यकर्त्यांकडून विचारणा झाली.