शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या तीन खोल्यांमध्ये नांदतंय १८ जणांचं कुटुंब

By admin | Updated: January 19, 2016 23:37 IST

आजी-नातवंडं-परतवंडं एकत्रच : परस्परांचा मानसिक आधार दूर-दूर पळवतोय येणारी संकटं--बिग फॅमिली

प्रगती जाधव-पाटील -- सातारा  -घरात एखादं कार्य असो, सणवार असो किंवा उन्हाळी कामं. महिलांबरोबरच बच्चे कंपनीचा हातभार लागतोच. घरातली कामे असोत व मुलांची जबाबदारी. सर्वांनीच वाटून घेतल्यामुळे घरातील कोणा एकावर त्याचा ताण येत नाही. अवघ्या तीन खोल्यांमध्ये राहणाऱ्या १८ जणांमध्ये दातृत्वाची प्रवृत्ती सर्वाधिक दिसते.येथील पंताच्या गोटात जगन्नाथ बाबूराव बाबर आणि जानकी बाबर यांच्या संसाराला सुरुवात झाली. खिंडवाडी गावातील या कुटुंबांची कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथे चांगली शेतजमीन आहे. त्यांना योजना, दिलीप, हरिविजय, सागर, योगीता अशी पाच मुलं. यातील योजना यांचा विवाह बाबर यांच्या बहिणीच्या मुलाशी झाला. त्या मल्हारपेठेत राहतात. तर योगीता विवाहानंतर सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यात स्थायिक झाल्या. जगन्नाथ बाबर यांचा मोठा मुलगा दिलीप पत्नी वसुंधरा यांच्याबरोबर ल्हासुर्णे येथील शेती पाहतात. त्यांची दोन मुलं प्रतीक आणि सिद्धी शिक्षणासाठी साताऱ्यातच राहतात.बाबर यांचा दुसरा मुलगा हरिविजय पत्नी हर्षल आणि मुलं रिद्धी, प्रथमेश आणि अभिषेक यांच्यासमेवत साताऱ्यात राहतात. ते पवनचक्की देखभालीची कामे पाहतात. त्यांची मुलगी रिद्धी हिचा विवाह राजेवाडी येथील प्रवीण भोसले यांच्याबरोबर झाला आहे. बाळंतपणासाठी ती सध्या माहेरी आहे.शेंडेफळ असणारे सागर पत्नी सरिता, संदेश व सुदेश या मुलांसह येथेच राहतात. सागर एका खासगी कारखान्यात नोकरीस आहेत. हजार स्क्वेअर फूट घरातही जिथं मुलांना अभ्यासाला एकांत मिळत नाही, अशी ओरड असते; मात्र तीन खोल्यांत १८ जणांमध्ये राहून बाबर यांच्या नातवंडांनी पदवी संपादन केली आहे. प्रत्येकाला एकमेकाचा आधार वाटत आहे.घरातील अठरा माणसांबरोबरच येणारे पाहुणे आणि त्यांची सरबराई करण्यातच या घरातील महिलांचा मोठा वेळ जातो. पहाटे साडेपाच वाजता उठलेले हे घर रात्री अकरापर्यंत झोपी जाते. १७ जणांच्या बाबर कुटुंबीयांना एका महिन्याला एक तेलाचा डबा लागतो. २५ किलो साखर, २५ किलो तांदूळ, ३० किलो गहू, ३० किलो ज्वारी, चार किलो पोहे, ३ किलो रवा, २ किलो गूळ, ४ किलो तूरडाळ, ३ किलो शेंगदाणे, १ किलो शाबुदाणा, दीड किलो चहा पावडर, ५ किलो हरभरा डाळ, ३ सिलिंडर लागतात. अंघोळीचे पाणी बंबात तापविण्यात येते. त्यासाठी ५ मण लाकूड लागते. एका वेळी एक किलोची फळभाजी व ३ पेंड्या पालेभाजी करावी लागते.संकटांची कधीच काळजी नाहीआपल्या कुटुंबाविषयी बोलताना बाबर म्हणतात, ‘आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे आम्हाला कधीच कोणत्या संकटाची काळजी वाटली नाही. गावात आणि समाजातही आमच्या एकीचे कौतुक केले जाते. हीच परंपरा पुढची पिढीही चालवणार आहे. नातवंडं अंगा, खांद्यावर खेळवून आमच्या आयुष्याचे सार्थक झाले आहे.