शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

स्मारकासाठी केवळ दहा लाख ही तर शाहूंची चेष्टाच..!

By admin | Updated: April 7, 2016 00:18 IST

कोल्हापुरात प्रतिक्रिया : मूळ प्रकल्प १६९ कोटींचा, त्यातील पहिला टप्पा ७९ कोटींचा मात्र, शासनाची तरतूद अवघी दहा लाखांची

विश्वास पाटील --कोल्हापूर -येथील शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारने केलेली दहा लाखांची तरतूद म्हणजे शाहू महाराजांच्या थोरवीची चेष्टाच असल्याची प्रतिक्रिया शाहूप्रेमींतून व्यक्त होत आहे. २०१५-१६ च्या दरसूचीनुसार या स्मारकाचा आराखडा सादर करण्याचे व जे घटक दरसूचीमध्ये समाविष्ट होत नाहीत, त्यांची किंमत निश्चित करून देण्याचे आदेश शासनाने महापालिकेस दिले आहेत. त्यानुसार सुधारित पहिल्या टप्प्याचा ७९ कोटींचा आराखडा आता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. या स्मारकासाठी अर्थसंकल्पात साडेतीन कोटी रुपयांची तरतूद केली व हे पैसे महापालिकेकडे सुपूर्द केले. शाहू मिल परिसरातील सत्तावीस एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू स्मारकाचा आराखडा कोथरूड (पुणे) येथील डिझाईन कन्सल्टंट आर्किटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा निश्चित करण्यात आला. त्याच संस्थेने स्मारकाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला. यातील त्रुटी दुरुस्त करून महापालिकेने २५ फेब्रुवारी २०१५ रोजी हा डीपीआर तांत्रिक मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला. साडेतीन कोटी दिल्यावर स्मारकाचे स्वतंत्र हेड करून बँकेत खातेही सुरू केले आहे.मंगळवारी विधानपरिषदेत आमदार सतेज पाटील यांच्या लक्षवेधीचे उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी या स्मारकासाठी दहा लाख रुपयांची तरतूद केल्याचे सांगितले. मूळ प्रकल्प १६९ कोटींचा. त्यातील पहिला टप्पा ७९ कोटींचा व शासनाची तरतूद अवघी दहा लाखांची. या रकमेतून संबंधित जागेला साधे कुंपणही होणार नाही.जागेची मालकी नाही..शाहू मिलच्या जागेची मालकी ही राज्य वस्त्रोद्योग महामंडळाकडे आहे. स्मारकाचे काम महापालिका करणार आहे; परंतु अद्याप वस्त्रोद्योग विभागाकडून ही जागा नगरविकास विभागाकडे हस्तांतरित झालेली नाही. तसा प्रस्ताव नगरविकास विभागाने देण्याची गरज आहे. जागेचे मूल्यांकन करून तिची किंमतही शासनाने वस्त्रोद्योग महामंडळास द्यावी लागेल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय हे स्मारकाचे काम पुढे सरकणार नाही.गेल्या सरकारने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या स्मारकासाठी समिती नियुक्त केली आहे. तिची २०१४ च्या आॅगस्टमध्ये शेवटची बैठक झाली. सरकार बदलल्याने नव्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती नव्याने नियुक्त करावी लागेल; परंतु ही प्रक्रिया झालेली नाही.कृती समितीची गरजशाहू महाराजांचे हे स्मारक चांगले व गतीने व्हायचे असेल तर टोल आंदोलनाप्रमाणे कोल्हापूरकरांना नव्याने चळवळ उभारण्याची गरज आहे. त्याचा दैनंदिन पाठपुरावा करण्यासाठी सर्वपक्षीय शाहूप्रेमी जनतेची कृती समिती स्थापन व्हावी; तरच हे काम पुढे सरकेल, अशी जनभावना आहे. शासनाला हे स्मारक करायचे तरी नाही किंवा सरकार या कामाबद्दल फारसे गंभीर नाही. दहा लाख रुपये देऊन शाहू महाराजांचीच चेष्टा केल्याची भावना आहे. - डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक