शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ही दोस्ती तुटायची नाय...‘फ्रेंडशिप डे’ला धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:40 IST

कोल्हापूर : ‘ही दोस्ती तुटायची नाय’, ‘मैत्रीचं नातं कसं जगावेगळं असतं, रक्ताचं नसलं तरी मोलाचं असतं’,‘भूतां परस्परें जडो, मैत्र जीवांचे’, ‘हॅप्पी फ्रेंडशिप डे’, अशा संदेशांची देवाण-घेवाण करत ‘फ्रेंडशिप बँड’ बांधून तरुणाईने रविवारी मैत्रीचे बंध घट्ट केले. सामाजिक उपक्रमांतून तरुणाईने ‘फ्रेंडशिप डे’ला विधायकतेची किनार लावली. सुटीचा दिवस आणि पावसाने उघडीप दिल्याने ...

कोल्हापूर : ‘ही दोस्ती तुटायची नाय’, ‘मैत्रीचं नातं कसं जगावेगळं असतं, रक्ताचं नसलं तरी मोलाचं असतं’,‘भूतां परस्परें जडो, मैत्र जीवांचे’, ‘हॅप्पी फ्रेंडशिप डे’, अशा संदेशांची देवाण-घेवाण करत ‘फ्रेंडशिप बँड’ बांधून तरुणाईने रविवारी मैत्रीचे बंध घट्ट केले. सामाजिक उपक्रमांतून तरुणाईने ‘फ्रेंडशिप डे’ला विधायकतेची किनार लावली. सुटीचा दिवस आणि पावसाने उघडीप दिल्याने तरुणाईने धम्माल केली.शहरातील न्यू कॉलेजवगळता अन्य महाविद्यालयांना सुटी असल्याने त्यांचा परिसर शांत होता. युवक-युवतींनी रंकाळा, भवानी मंडप, कॅफे हाऊस, रेस्टॉरंट, विविध बगीचांमध्ये भेटून एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधून मैत्रीचे बंध घट्ट केले. काहींनी एकमेकांना फोटो फ्रेम, किचेन, गुलाब, कॉफी मग, टी-शर्ट अशा भेटवस्तू दिल्या. काही शहराबाहेर फिरायला गेले होते. शालेय विद्यार्थ्यांनीही आपली कॉलनी, अपार्टमेंट, गल्लीमधील मित्र-मैत्रिणींना बँड बांधल्या. खासगी क्लास, हॉटेलबाहेर काही युवक, युवतींचा गप्पांचा फड रंगला. काहींनी महाविद्यालयाचे दिवस संपल्यानंतर काहीजणांनी एकत्र येऊन मैत्रीदिन साजरा केला.दरम्यान, विधायक उपक्रमांमध्ये वाय. डी. माने इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमधील सांस्कृतिक विभागाने ‘फ्रेंडशिप वुईथ ट्रीज’ ही संकल्पना राबविली. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातील ५० हून अधिक झाडांना फ्रेंडशिप बँड बांधून त्यांच्या संवर्धनाची शपथ घेतली. यावेळी संस्थेचे संचालक बिपीन माने, अधिष्ठाता शिल्पा पाटील, प्राचार्य दिग्विजय पवार, प्रा. रोहन वर्पे, सुजाता सोलापुरे, अश्विनी बन्ने, आदी उपस्थित होते.सोशल मीडियावर आनंदोत्सवमैत्रीविषयक मराठी, हिंदी, इंग्रजी अशा संदेशांची रविवारी सकाळपासून व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून देवाण-घेवाण सुरू होती. बँड बांधल्यानंतर एकत्रितपणे सेल्फी घेऊन तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येत होता. वर्ग, कामाच्या ठिकाणच्या मित्रांसमवेतची छायाचित्रे, मैत्रविषयक संदेश, व्हिडीओ, गाणी अनेकांच्या व्हॉटस्अ‍ॅप स्टेटस्वर झळकली होती.‘राजाराम’च्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधीलकीराजाराम महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी बालकल्याण संकुलातील मुलांसमवेत मैत्रीदिन साजरा केला. या विद्यार्थ्यांनी मुलांना दैनंदिन उपयोगाच्या साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधीलकी जोपासली. या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. अण्णासाहेब खेमनार, वसतिगृह अधीक्षक प्रा. विश्वनाथ बिटे यांचे मार्गदर्शन लाभले.निर्व्यसनी, भ्रष्टाचारमुक्तीचा संकल्प : युवासेना आणि नो मर्सी ग्रुपतर्फे आयोजित ‘मैत्री युवा’महोत्सवात तरुणाईने निर्व्यसनी आणि भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्याचा संकल्प केला. त्यानंतर रॉक बँड डान्स ग्रुपच्या नृत्य अविष्काराचा आनंद लुटत जल्लोष केला.