शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

अंबाबाईचे केवळ दर्शन; ओटी, प्रसादावर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:25 IST

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेपासून येथील करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर भक्तांसाठी खुले होत असले तरी भक्तांना देवीसाठी ...

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेपासून येथील करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर भक्तांसाठी खुले होत असले तरी भक्तांना देवीसाठी ओटी, साडी तसेच प्रसाद अर्पण करण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे भाविकांना केवळ दर्शनच घ्यावे लागणार आहे. तसेच टेंबलाई येथे होणारी ललितपंचमी यात्राही होणार नाही.

राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर मंदिरात जाण्याची लाखो भाविकांना आस लागली आहे. मंदिरे खुली होणार असली तरी तिसऱ्या संभाव्य लाटेची खबरदारी म्हणून मंदिर प्रशासनास काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्या दृष्टीने पूर्वतयारी मंदिर प्रशासनाकडून सुरू झाली आहे.

अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवात भाविकांची मोठी गर्दी होते; त्यामुळे दर्शनरांगेसह भाविकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याचे नियोजन देवस्थान व्यवस्थापन समितीकडून करण्यात आले आहे. पूर्व दरवाजातून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आल्यानंतर त्यांना इतरत्र कुठेही न फिरता दर्शन झाल्यानंतर थेट दक्षिण दरवाजातून बाहेर पाठविले जाणार आहे. तसेच भाविकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था केली जात आहे. केवळ दर्शनाचा लाभ घेता येणार असल्याने भाविकांनी ओटी, साड्या तसेच प्रसादाचे साहित्य देवीला अर्पण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

मंदिर सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू ठेवण्याचा तसेच रात्री नऊ वाजताचा पालखी सोहळा मर्यादित पुजारी, मानकरी, देवस्थानचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी कोणाही भाविकांना मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. जास्तीत जास्त भाविकांना घरबसल्या दर्शन घेण्याची सोयदेखील केली जात आहे.

ललितपंचमी यात्रा मोजक्या भाविकांत

नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी ग्रामदेवता टेंबलाईदेवीच्या मंदिरात भरणारी ललितपंचमी यात्रा भाविकांसाठी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या दिवशी येथे मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची पूजाअर्चा तसेच धार्मिक विधी होणार आहेत. या ठिकाणी कोहाळे फोडण्याचा विधी ठरावीक मानकऱ्यांच्या उपस्थितीत होईल. यात्रेदिवशी अंबाबाई देवी उत्सवमूर्ती पालखीतून लवाजम्यासह टेंबलाईला भेटीसाठी नेण्यात येते; पण कोरोना संसर्गाचा धोका असल्याने पालखी वाहनातून नेण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

नवरात्रौत्सवात दहा दिवस अंबाबाई मंदिरात सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात; पण सलग दुसऱ्या वर्षी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

(फोटो देत आहे.)