शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

केवळ विश्वासार्हतेमुळे ‘ते’ घडले नाही

By admin | Updated: November 14, 2015 01:15 IST

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे खुलासा केला आहे.

कोल्हापूर : ताराराणी आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महानगरपालिकेत सत्ता स्थापन करून सर्व पदे घ्यावीत, भाजप त्यास बाहेरून पाठिंबा देईल त्यासाठी सहकार्य करावे, असा प्रस्ताव भाजपकडून आला होता. त्यावर पक्षश्रेष्ठी शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे यांच्याबरोबर सविस्तर चर्चाही झाली होती; परंतु विश्वासार्हतेचा प्रश्न होता, त्यामुळेच हे घडू शकले नाही, असा खुलासा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे केला आहे. राष्ट्रवादीच्या सहकार्याने भाजपचा महापौर करण्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न सोडून दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पालकमंत्री पाटील यांनी ‘घोडेबाजार करणार नाही, विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू; परंतु निवडणूक बिनविरोध होणार नाही,’ असे वक्तव्य केले आहे. त्याबाबत पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. परंतु त्यांनी जी भूमिका घेतली त्याचे स्वागत आहे. ‘अध्यात्म व चमत्कार’ हे शब्द कानावर येताच मी संभ्रमित झालो होतो. घोडेबाजाराचा अनुभव अंगावर काटा आणणारा होता. जर दादांची मनापासून ही भूमिका असेल तर सत्तारूढ आघाडीबरोबर शहराच्या विकासासाठी व इतर प्रकल्प आणण्यासाठी मनापासून साथ द्यावी. त्याचे श्रेय त्यांनाच देऊ. शासनाकडून निधी आणण्याकरीता आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील. नगरसेवकांमध्ये भेदाभेद केला जाणार नाही. चंद्रकांत पाटील हे भला व चांगला माणूस आहे. याबाबत आजही माझे मत त्यांच्याबद्दल कायम आहे; परंतु काही शक्ती मतभेद व गैरसमज करून देण्याचा प्रयत्न करत असतात. दादा आमची भूमिका समजून घेतील. उद्या होणाऱ्या निवडणूक बिनविरोध करतील. शहराच्या विकासासाठी प्रचंड निधी आणतील, असा माझा विश्वास आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)