शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

ऊस तोडणी कामगारांच्या पदरात १६ टक्केच

By admin | Updated: November 2, 2015 00:35 IST

लवादाची मजुरी वाढ फसवी : कारखान्यांसमोर मजुरांचे संकट; राज्यातील कामगारांचे ११२ कोटी बुडणार

 वीरकुमार पाटील ल्ल कोल्हापूर ऊसतोडणी कामगार संघटनांच्या रेट्यामुळे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाने नेमलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या लवादाने ऊस तोडणी कामगारांसाठी २० टक्के मजुरीवाढीची घोषणा केली आहे. मात्र, ही वाढ फसवी असून, प्रत्यक्षात १६ टक्केच वाढ पदरात पडणार असल्याने कामगार उसाला सहजासहजी कोयता लावतील, याची खात्री नाही. त्यामुळे आधीच साखरेच्या कमी भावामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखानदारीसमोर दुहेरी संकट उभारले आहे. यंदा दुष्काळाचे संकट आहे. त्यामुळे उसाचे एकरी उत्पादन घटणार आहे. त्यातच साखरेचे दर पडल्याने शासनाच्या नियमानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यायला साखर कारखानदार राजी नाहीत. तसेच ऊस तोडणी कामगारांची मजुरी व कमिशन वाढीची मागणी सरकार पूर्ण करू शकले नाही, असा आक्षेप संघटनांनी घेतला आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या लवादाने ऊस तोडणी कामगारांसाठी २० टक्के वाढीची केलेली घोषणा फसवी आहे. कारण लवादाने सूचवलेली मजुरीवाढ ही पाच वर्षांसाठी आहे. म्हणजे वर्षाला ४ टक्के वाढ मिळणार आहे. ऊसतोड कामगार कल्याण मंडळ डिसेंबर २०१४ मध्ये स्थापन झाले. त्यामुळे या गळीत हंगामापासून कामगारांना मजुरीवाढ देणे संघटनांच्या मते अपेक्षित होते. मात्र, मागच्या वर्षी अशी कोणतीही वाढ मिळाली नाही. लवादाने सूचवलेली वाढ ही यंदाच्या हंगामापासून मिळणार असली तरी गत हंगामातील चार टक्के वाढ बुडाली आहे. २0१४-२0१५ च्या हंगामात साखर कारखान्यांनी टनाला तोडणी-ओढणी प्रतिटन १९0 रुपये व १८ टक्के कमिशन असे २२५ रुपये दिले आहेत. एक कामगार हंगामात सरासरी १५0 मे. टन ऊस तोडून ३३ हजार ७५0 रुपये मजुरी मिळवतो. या मजुरीवरील चार टक्के वाढ आणि कमिशन असे अंदाजे १४०० रुपये बुडाले आहेत. महाराष्ट्रात स्थानिक व स्थलांतरित असे आठ लाख ऊसतोड कामगार आहेत. या सर्वांचे मिळून सरासरी ११२ कोटी रुपये बुडाले आहेत. जिल्ह्यातील साधारण ३५ हजार कामगारांचे चार कोटी ९0 लाख बुडाले आहेत. अपेक्षित वाढ मिळणार नसल्याने कामगार काम करण्यास नाखूश आहे. त्यामुळे कामगारांना आणणे कारखानदारांसमोर मोठे आव्हान आहे. मुकादम आणि वाहनधारकांनाही याचा फटका बसणार आहे. गत साली ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चांगली मजुरीवाढ देण्याची घोषणा केली होती. ही वाढ गत हंगामापासून देणार, असे अपेक्षित धरून कामगारांनी मुकादमांना अंगावर असलेल्या बाकीतून वाढीची रक्कम वजा करण्याचे सुचविले आहे. वाहनधारकांचीही अशीच अवस्था आहे.