शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला खरेदीही आॅनलाईन

By admin | Updated: March 28, 2016 00:43 IST

घरपोच सेवा : शहरातील रोज शंभर ग्राहकांना पुरवठा

कोल्हापूर : भाजीपाला, फळे आॅनलाईन किंवा फोन करून, व्हॉटस् अ‍ॅपवरून मागणी नोंदवल्यास घरपोच सेवा देण्याची व्यवस्था आता कोल्हापुरात निर्माण झाली आहे. भाजीपाला व्यवसायिक राहुल चौगुले (रा. गांधीनगर, कोल्हापूर) व फळ विक्रेते इरफान बिजली (रा. यादवनगर, कोल्हापूर) यांनी १५ मार्चपासून ही सेवा सुरू केली आहे. बाजारभावाप्रमाणे घरबसल्याच भाजीपाला, फळे मिळत असल्याने मंडईत जाण्या-येण्याचा खर्च वाचत आहे. सरासरी सध्या शहरातील १०० ग्राहकांना रोज मागणीप्रमाणे पुरवठा केला जात आहे. आॅनलाईन खरेदी केल्यानंतर वस्तू स्वस्त मिळतात. याशिवाय दुकान शोधण्याचा वेळ व जाण्या-येण्याचा खर्च वाचतो. त्यामुळे दिवसेंदिवस आॅनलाईन वस्तू खरेदी (शॉपिंग) करण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे. परवडेल अशा किमतीमध्ये स्मार्ट मोबाईल संच मिळत आहे. त्यामुळे शहर व खेड्यातील मध्यमवर्गीयांकडेही हा मोबाईल आहे. इंटरनेट कनेक्शन असल्यामुळे व्हॉटस् अ‍ॅप मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात सोशल मीडियाचा वापर वाढतो आहे म्हणूनच आॅनलाईन मागणी नोंदवलेल्यांना घरपोच पुरवठा करण्याची सेवा देण्यास या दोन व्यावसायिकांनी सुरुवात केली आहे.एक ते पुढे कितीही किलोपर्यंत आॅर्डर दिली तरी पोहोच केली जात आहे. दुपारी एकपर्यंत आॅर्डर दिल्यानंतर सायंकाळी चारनंतर, तर दुपानंतर आॅर्डर दिल्यास दुसऱ्यादिवशी पोहोच केली जाते. पोहोच झाल्यानंतर पैसे देण्याची व्यवस्था आहे. नागाळा पार्क, ताराबाई पार्क, राजारामपुरी, रूईकर कॉलनी, रमणमळा, शाहूपुरी, न्यू पॅलेस या परिसरातून आॅनलाईन मागणी अधिक आहे.भविष्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माल खरेदी करणे आणि ग्राहकांना पुरवठा करणे अशी व्यवस्था निर्माण करण्याचे नियोजन आहे. ही व्यवस्था कार्यान्वित झाल्यास ग्राहकांना बाजारपेठेपेक्षा कमी भावाने घरपोच भाजी, फळे देणे शक्य होणार आहे. आता मागणीप्रमाणे मंडईत जाऊन चांगल्या दर्जाची भाजीपाला, फळे, कांदे, बटाटा खरेदी केली जाते. त्यानंतर ग्राहकांना पोहोच केले जाते. - राहुल चौगुले, कोल्हापूरआॅनलाईन बुकिंगमुळे घरपोच भाजीपाला, कांदा मिळतो. त्यामुळे जाण्या-येण्याचा खर्च वाचतो. तीन, चारवेळा आॅर्डर दिली होती. सेवाही चांगली वाटली.- संजया माने, गृहिणी, ताराबाई पार्क,