नूल : आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेल्या नूल (ता. गडहिंग्लज) या गावात गेल्या ५० वर्षांपासून ‘एक गाव -एक गणपती’ची परंपरा जोपासली आहे. येथे उजव्या सोंडेची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना महाराष्ट्रात अलीकडे काही वर्षांत रुजत आहे. मात्र, नूल या हजार लोकसंख्येच्या गावात गेल्या कित्येक वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात नाही. गावात माजी सरपंच कृष्णराव चव्हाण, व्यंकटराव पोवार, मारुती काळे, गोविंद सुतार, आदींनी लोकवर्गणी व श्रमदानातून गणपतीचे मंदिर बांधले. तानुमाई मिलके यांनी मंदिरासाठी मोफत जागा दिली, तर विमलाबाई फुलसुंदर यांनी अत्यंत सुबक अशी उजव्या सोंडेची मूर्ती दिली.१९६४ मध्ये या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला. चार वर्षांपूर्वी कै. जनार्दन सावंत यांच्या पुढाकाराने २५ लाख रुपये खर्चून दुसरा जीर्णोद्धार झाला. त्यासाठी ग्रामस्थांचे योगदान व श्रमदान हीच संकल्पना होती.मंडळाचे अध्यक्ष विश्वजित सावंत यांच्या नेतृत्वाखाली येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते. (वार्ताहर)
नूलमध्ये ५० वर्षांपासून ‘एक गाव-एक गणपती’
By admin | Updated: September 5, 2014 00:20 IST