शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘ए-वन’ विद्यापीठाच्या पदरी निधींचा दुष्काळ

By admin | Updated: March 10, 2016 01:08 IST

शिवाजी विद्यापीठ : सुवर्णमहोत्सवी निधीतील ४५ पैकी धड तीन कोटीही नाहीत

कोल्हापूर : राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक) ‘ए-वन’ मूल्यांकनाच्या जोरावर गुणवत्तेचा केंद्रबिंदू दक्षिण महाराष्ट्राकडे सरकविणाऱ्या शिवाजी विद्यापीठाला सुवर्णमहोत्सवी निधीतील धड तीन कोटी रुपयेदेखील गेल्या चार वर्षांत मिळालेले नाहीत. जाहीर झालेला निधी देण्याबाबतची तत्कालीन आणि विद्यमान सरकारची भूमिका ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणाऱ्या विद्यापीठाच्या विकासाला मारक ठरत आहे.विद्यापीठाने १८ नोव्हेंबर २०११ रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. या वर्षात काही नवे विभाग सुरू करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने राज्य शासनाला ५० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला. त्यावर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने ४५ कोटी रुपयांचा निधी विद्यापीठाला मंजूर केला. त्यातील ४० कोटी ३३ लाख रुपये विद्याशाखांचे बांधकाम, यंत्रसामग्रीसाठी, तर विविध ११३ पदांसाठी चार कोटी ६७ लाख रुपये होते. त्यांपैकी गेल्या तीन वर्षांत अवघे दोन कोटी ७९ लाख ९९ हजार रुपये विद्यापीठाला मिळाले आहेत. त्यातील सुवर्णमहोत्सवी वर्ष झाल्यानंतर पहिल्या वर्षी दोन कोटी ४० लाख रुपये, दुसऱ्या वर्षी ३९ लाख ९९ हजार रुपये विद्यापीठाला मिळाले. त्यामुळे विद्यापीठाने हाती घेतलेले विभाग, प्रकल्पांची गती मंदावली आहे. हा निधी मिळविण्याबाबत विद्यापीठाने शासन दरबारी आतापर्यंत २५ पत्रे पाठविली आहेत. शिवाय मंत्रालयात विद्यापीठातील अधिकाऱ्यांसमवेत बैठका झाल्या आहेत. राज्यात भाजप-सेना सरकार सत्तेत आल्यानंतरही विद्यापीठाने मागणीनुसार वेळोवेळी निधीबाबतचे प्रस्तावही दिले आहेत. पत्रव्यवहार सुरू असून विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या महिना-दीड महिन्याला मंत्रालयात येरझाऱ्या सुरू आहेत. नियोजनाप्रमाणे संबंधित प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या उद्देशाने उर्वरित निधी विनासायास मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती पूर्णपणे फोल ठरली आहे. (प्रतिनिधी)लोकप्रतिनिधींचा आवाज नाहीकोल्हापूर, सांगली व सातारा असे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. या तिन्ही जिल्ह्यांतून ३० आमदार विधानसभा, विधान परिषदेत प्रतिनिधित्व करतात. ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देणारे विद्यापीठ हे आपले असून त्याच्या विकासाला सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी विविध कार्यक्रमांत दिली आहे. मात्र, यातील एकाही लोकप्रतिनिधींनी गेल्या चार वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित असलेल्या सुवर्णमहोत्सवी निधी विद्यापीठाला मिळवून देण्याचा मुद्दा मांडला नसून आवाज उठविलेला नाही.सुवर्णमहोत्सवी निधी शासनदरबारी प्रलंबित राहिल्याने प्रस्तावित उपक्रम रखडले आहेत. निधीसाठी विद्यापीठाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, दरवेळी निधी दिला जाईल, असे उत्तर सरकारकडून मिळत आहे. निधीबाबत सरकार सकारात्मक आहे; पण प्रत्यक्षात निधी लवकर मिळणे हे विविध उपक्रमांच्या पूर्ततेसाठी आवश्यक आहे.- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू