शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘वन टू का फोर’चे राजकारण गाडणार!

By admin | Updated: October 9, 2015 01:13 IST

नगरपरिषद पोटनिवडणूक : राजकीय वातावरण तापले; युतीचा संसार मोडला--रणसंग्राम

रत्नागिरी : कोणा एका व्यक्तीच्या पक्षातून जाण्यामुळे शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही. उमेश शेट्येंचा करिश्मा केव्हाच संपला आहे. त्यामुळे ते पालिका पोटनिवडणुकीत कोणताच चमत्कार घडवू शकणार नाहीत. त्यांच्या ‘वन टू का फोर’ व ‘बनेगा तो बादशहा’ हे राजकारण शिवसैनिक गाडून टाकतील व चारही जागांवर सेनाच विजयी होईल, असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी आज (गुरूवारी) पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शिवसेनेतर्फे पोटनिवडणुकीसाठी चार उमेदवारांच्या नावाची घोषणा गुरुवारी करण्यात आली. शिवसेनेला मदत करताना पक्षांतर केलेल्या चार नगरसेवकांना न्यायालयाने अपात्र ठरवले. मात्र, त्यांचा सेनेसाठीचा त्याग शिवसेना विसरणार नाही. त्यामुळेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अपात्र झालेले बाळू साळवी, प्रीती सुर्वे, स्मितल पावसकर व मुनीज जमादार हे चारही नगरसेवक सांगतील त्यांनाच उमेदवारी देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसारच रत्नागिरीतील पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामधील पूर्वा सुर्वे या प्रीती सुर्वे यांच्या स्नुषा आहेत. उमेदवार ऋतुजा देसाई या स्मितल पावसकर यांच्या नातेवाईक आहेत. उमेदवार दिशा साळवी या बाळू तथा दत्तात्रय साळवी यांच्या पत्नी आहेत, तर उमेदवार तन्वीर जमादार हे मुुनीज जमादार यांचे पती आहेत. सेनेसाठी त्याग करणाऱ्यांच्या मागे सेना ठामपणे उभी राहते, असे यावेळी आमदार राजन साळवी, उदय सामंत व जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी सांगितले. आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.(प्रतिनिधी)