शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी निर्णय झाल्यास उद्रेक होईल

By admin | Updated: June 18, 2016 00:40 IST

हद्दवाढविरोधी कृती समितीचा इशारा : बस बंद केल्यास पाणीपुरवठा, विमानतळाचा रस्ता बंद करू

कोल्हापूर : ग्रामीण जनतेचा शहराच्या हद्दवाढीला अनेक कारणांनी तीव्र विरोध आहे; म्हणूनच या जनतेच्या भावनेचा विचार न करता शहराच्या हद्दवाढीचा एकतर्फी निर्णय घेतला गेल्यास उद्रेक होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल, असा गर्भित इशारा शुक्रवारी हद्दवाढविरोधी कृती समितीने शासनाच्या द्विसदस्यीय समितीला दिला. याचवेळी आमच्या गावातील बससेवा बंद केली तर शहराचा पाणीपुरवठा तसेच विमानतळाकडे जाणारा रस्ता बंद केला जाईल, असा इशाराही महानगरपालिकेला देण्यात आला. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात हद्दवाढविरोधी कृती समितीचे म्हणणे ऐकून घेतले. कृती समितीच्या तीन आमदारांसह २७ जणांनी सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीत हद्दवाढ का होऊ नये, याची कारणे सांगितली. तसेच सुमारे ४०० पानांचा एक अहवालही सादर केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत उपस्थित होते.शहरालगतची अठरा गावे आणि दोन औद्योगिक वसाहती यांचा शहराच्या हद्दवाढीत समावेश केला गेला तर ग्रामीण संस्कृती, शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होईल. आमच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. शहरात आल्यामुळे करांचा बोजा पडेल. त्यामुळे आमचे जगणे अडचणीचे होईल, अशी भीती बैठकीत अनेकांनी बोलून दाखविली. तसेच आधी शहरातील नागरिकांना, उपनगरांना चांगल्या सुविधा द्या, मग ग्रामीण भागाच्या विकासाचे बघा, अशी उपहासात्मक टीकाही यावेळी करण्यात आली. महानगरपालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. शहरातील रुग्णालये, शाळा बंद पडत आहेत, आरक्षणे उठविली जात आहेत. अशा परिस्थितीत नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांना विकासाच्या कोणत्या योजना देणार आहात, असा प्रश्नही उपस्थित केला गेला. हद्दवाढ झाल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही, असा बागुलबुवा करून केवळ ग्रामीण भागातील जागांवर महानगरपालिकेचा डोळा आहे; त्या लाटण्यासाठीच हद्दवाढीचा आग्रह धरला जात आहे, असा आरोपही बैठकीत करण्यात आला. आमचं मस्त चाललंयसमितीचे निमंत्रक नाथाजी पवार यांनी बैठकीत हद्दवाढ नको असल्याची कारणे स्पष्ट केली. प्रस्तावित हद्दवाढीच्या गावांतून १८६ कोटींचे कृ षी उत्पन्न मिळते. २२ कोटींचे उत्पन्न हे दुधाच्या व्यवसायातून मिळते. अठरा गावांतील शेतजमिनीतून येणाऱ्या उसाचे बिल १०० कोटींच्या वर आहे. या गावांना केंद्र, राज्य शासन तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ६६ कोटींचा निधी मिळाला आहे. चौदाव्या वित्त आयोगातर्फे आता थेट निधी मिळतो. त्यामुळे आमची गावे विकसित करायला आम्ही सक्षम आहोत. त्यासाठी आम्हाला कोणाच्या वळचणीला जायची गरज नाही. याउलट महानगरपालिकेच्या प्रशासनाने गेल्या ४६ वर्षांत एक रुग्णालय उघडले नाही, एक शाळा सुधारली नाही, भ्रष्टाचार बोकाळला आहे, करांचे ओझे लादले आहे; म्हणूनच आम्हाला शहरात यायचे नाही, असे पवार यांनी सांगितले. मीही उपोषणास बसणार : नरके शहराच्या हद्दवाढीसाठी विधानभवनासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. हद्दवाढ होऊ नये म्हणून मीसुद्धा आमरण उपोषणास बसणार आहे, असा इशारा आमदार नरके यांनी दिला. महानगरपालिकेवर असलेली कर्जे आणि त्यांचे उत्पन्न पाहता हद्दवाढ झाल्यानंतर जनतेला ते सुविधा देऊ शकणार नाहीत. हद्दवाढीमुळे ग्रामीण जनतेचे नुकसान होईल, म्हणूनच आमचा विरोध आहे, असे नरके म्हणाले. ...तर काळम्मावाडी योजना बंद करूजर ग्रामीण जनतेला देण्यात येणाऱ्या सुविधा बंद केल्या तर शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या काळम्मावाडी योजनेचे काम बंद पाडले जाईल, असा इशारा आमदार चंद्रदीप नरके यांनी दिला. ते म्हणाले की, पाणीटंचाईच्या काळात शहराला आम्ही तुळशी, धामणी धरणांतून पाणी दिले आहे हे लक्षात ठेवावे. शिंगणापूर पाणी योजनेला आम्ही जागा दिली आहे. या योजनेतून उपसा बंद केला तर चालेल का? शहरात येण्यास ग्रामीण जनतेचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे आमच्या मानसिकतेचा विचार करावा. जर तो केला नाही तर मोठा उद्रेक होईल. त्याची जबाबदारी शासनावर राहील.