शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तिन्ही करारावेळी एकच अधिकारी?

By admin | Updated: March 27, 2015 00:21 IST

शिवसेना, ‘प्रजासत्ताक’चा अधिकाऱ्यावर आक्षेप

कोल्हापूर : जनता बझारच्या रुईकर कॉलनी, शिवाजी पेठ व राजारामपुरी येथील मिळकतींचा भाडेकरार करताना या तिन्ही ठिकाणी मुद्रांक शुल्क विभागाचे करवीर क्रमांक १ चे सह. दुय्यम निबंधक वर्ग २ अधिकारी एस. पी. लादेच कसे? असा आक्षेप शिवसेना व प्रजासत्ताक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्यांनी गुरुवारी मुद्रांक जिल्हाधिकारी उदयराज चव्हाण यांची भेट घेऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावर चव्हाण यांनी या संदर्भात मंगळवारी (दि. ३१) सुनावणी घेतली जाईल, असे सांगितले. कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील मुद्रांक शुल्क कार्यालयात गुरुवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संजय पवार यांनी, आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार झाला आहे का? अशी शंका वाटते. त्यामुळे त्यांचीही चौकशी करून गुन्हे दाखल करावेत. तसेच तक्रारदारांची माहिती चुकीची वाटत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी चव्हाण यांच्याकडे केली. उदयराज चव्हाण यांनी तक्रार अर्जानुसार करार करून देणारे व घेणारे यांची मंगळवारी (दि. ३१) सुनावणी घेऊन त्यावर निर्णय देऊ असे सांगितले. तसेच दस्ताची वैधता व आक्षेपाचे स्वरूप तक्रारदारांनी सविस्तरपणे द्यावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सह. दुय्यम निबंधक वर्ग २ अधिकारी एस. पी. लादे, दिलीप पाटील-कावणेकर, कमलाकर जगदाळे, शशी बिडकर, अप्पा पुणेकर, रवी चौगुले, रणजित आयरेकर, दत्ताजी टिपुगडे, हर्षल सुर्वे, प्रवीण पालव, आदी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)