शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतील १० लाख कर्मचारी उतरणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST

काेल्हापूर : आय. डी. बी. आय. तसेच दोन राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. यामुळे बँकिंग ...

काेल्हापूर : आय. डी. बी. आय. तसेच दोन राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. यामुळे बँकिंग क्षेत्रात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होऊन ठेवीदारांचे पैसे असुरक्षित होण्याचा धोका आहे. त्यामुळे सरकारने खासगीकरणाचा प्रस्ताव मागे घ्यावा, या मागणीसाठी १५ आणि १६ मार्च रोजी देशातील राष्ट्रीयीकृत बँक बंद ठेवून १० लाख कर्मचारी रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज, सोमवारी काळ्या फिती लावून काम करणार आहे.

तुळजापूरकर म्हणाले, खासगीकरणामुळे १५ आणि १६ मार्चच्या आंदोलनात ९ संघटनांसह राष्ट्रीयीकृत बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, जुन्या जमान्यातील खासगी बँक आणि विदेशी बँकातील सफाई कर्मचारी ते अधिकारी सर्वजण सहभागी होणार आहेत. यामध्ये देशात १० लाख, राज्यात ६० हजार, तर कोल्हापुरात २६ राष्ट्रीयीकृत बँकांच्या ३०० शाखेतील सहा हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर युनियनचे सेक्रेटरी सूर्यकांत कर्णिक, धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.

चौकट

तर पुन्हा सावकारीराज

तुळजापूरकर म्हणाले, खासगी क्षेत्रातील अनेक मोठ्या बँका राष्ट्रीयीकृत बँकामुळेच वाचू शकल्या आहेत. नुकत्याच खासगी, अर्बन नागरी अशा तीन बँक बुडाल्या. येथील ठेवीदार हवालदिल झाले आहेत. अशी स्थिती असतानाच राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण केल्यास बँकिंग क्षेत्रात अस्थितरता निर्माण होणार असून बँकिंगवरील विश्वास उडेल. देशाची अर्थव्यवस्था अडचणीत येण्याचा धोका असून पुन्हा सावकारीराज सुरू होईल.

चौकट

चोरांच्या हातात चावी देण्याचा प्रकार

तुळजापूरकर म्हणाले, थकबाकीच्या तरतुदीमुळे (एनपीए) नफ्याची रक्कम तोट्यात जात आहे. या थकबाकीमध्ये ७० टक्के वाटा मोठ्या उद्योगांचा आहे. खासगीकरणामुळे बँकांचे नियंत्रण भांडवलदारांकडे जाणार आहे. ज्यांनी बँक लुटली तेच मालक होणार असून चोरांच्या हातात चावी देण्याचा हा प्रकार आहे. यामुळे सामान्य जनतेचे ७० लाख कोटी रुपये धोक्यात येण्याची शक्यता आहे.

चौकट

आंदोलनाचे टप्पे

२२ मार्च काळ्या फिती लावून काम

२३ मार्च आझाद मैदानावर धरणे

१ मार्च ‘खासगीकरणाला विरोध’ असे लिहिलेले मास्क लावून काम

१ ते १० मार्च प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलन, प्रस्ताव मंजूर करू नका, असे निवेदन खासदारांना देणार

चौकट

लढाईत जनतेला सहभागी करा

बँक खासगीकरणाचे परिणाम व संघटनेच्या आंदोलनाची भूमिका समजावून सांगण्यासाठी विश्वेश्वरय्या मेमोरिअल हॉलमध्ये सर्व राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचारी, अधिकारी यांची सभा झाली. यावेळी देविदास तुळजापूरकर यांनी १५ आणि १६ मार्च रोजीच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. खासगीकरणामुळे ग्राहकांवर काय परिणाम होणार हे त्यांना माहितीपत्रक देऊन पटवून द्या, संघटनेच्या लढाईत त्यांना सहभागी करून घ्या, असे आवाहन केले.