शिरोळ : भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने तरुण ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पावणेचारच्या सुमारास शिरोळमधील बुवाफन मंदिरासमोर घडली. चनाप्पा लक्ष्मण शिवशरण (वय २८, रा. कागनारी, ता. जत, जि. सांगली) असे मृताचे नाव आहे. या अपघाताची नोंद शिरोळ पोलिसात झाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, कंटेनर भरधाव वेगाने निघाला होता. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला घेत असताना कंटेनरची धडक दुचाकीला बसली. यात चनाप्पा शिवशरण हा काही समजण्याअगोदरच कंटेनरच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. याबाबतची तक्रार विनायक पाटील (रा. दत्तनगर शिरोळ) यांनी पोलिसात दिली असून, सुभाष अत्तरचंद कुमार (रा. दमदमा, राजस्थान) या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.