शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोळीबार’ची एक इंचही जमीन धनदांडग्यांना मिळू देणार नाही

By admin | Updated: October 24, 2015 01:19 IST

एकनाथ खडसे यांचा इशारा : काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करण्याचे आवाहन

कोल्हापूर : पोलिसांच्या सरावासाठी असलेल्या गोळीबार मैदानावर कोणीतरी धनदांडगे नजर ठेवून हडप करण्याच्या प्रयत्नात आहेत; परंतु यातील एक इंचही जमीन त्यांना घेऊ देणार नाही, असा खणखणीत इशारा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे दिला.कसबा बावडा येथील गवत मंडई येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शामराव धोंडी पाटील होते. खडसे म्हणाले, कोल्हापूरकरांवर टोल लादणारेच आता टोलमाफीची मागणी करत आहेत; परंतु हा टोल आणला कुणी? आयआरबीला परवानगी दिली कुणी? त्यासाठी ठराव कुणी केला? राज्यात सत्ता असताना तो का घालविला नाही ?अशी विचारणाही त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला केली. हा टोल भाजपच घालविणार आहे. त्यासाठी सरकारच पैसे देईल, बंटी पाटील, पृथ्वीराज चव्हाण किंवा शरद पवार त्यासाठी पैसे देणार नाहीत.कसबा बावड्यातील माजी गृहराज्यमंत्र्यांच्या झुंडशाहीला सुरूंग लावा, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले. केंद्राच्या योजना शहरात आणण्यासाठी भाजपला सत्ता दिल्यास शहराचा कायापालट करू, असे ते म्हणाले. ‘हसनमियाँ’नी उमेदवारांची डिपॉझिट वाचवून दाखवावी‘हसनमियाँ’ जनतेला मूर्ख बनवायचे काम करत आहेत. एकाबरोबर ‘पैरा’ फेडण्याची भाषा करत ते महाडिकांच्या वळचणीलाही जाऊन बसतात. त्यांनी कसबा बावडा व कदमवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची डिपॉझिट वाचवून दाखवावी, असे आव्हान माजी महापौर सुनील कदम यांनी दिले. हसन मुश्रीफ यांच्यावर कदम यांनी चांगलेच तोंडसुख घेत ते प्रत्येकाबरोबर सेटलमेंट करतात, असा आरोपही केला.रमणमळा तलावाची जागा बंटी, मुश्रीफ यांनी घशात घातलीरमणमळ्यातील तलावाची शासकीय जागा माजी गृहराज्यमंत्री बंटी पाटील यांनी घशात घातली आहे. त्यातील १५ हजार स्क्वेअर फूट जागाही हसन मुश्रीफ यांनी लाटली आहे. त्या जागेवरील सात बारावर मुश्रीफ यांच्या मुलाचे नाव आहे. हे सर्व सात बारे आपण काढले असून ते चौकशीसाठी मंत्री खडसे यांना देणार आहे, असा घणाघाती आरोप सुनील कदम यांनी केला. गोळीबार मैदानावरील पोलिसांचा सराव का थांबला? हे मैदान कोणी घशात घातले? अशी विचारणा करत जागा हडपणाऱ्यांना हद्दपार करा, असे आवाहनही त्यांनी केले.उरल्या सुरल्या शिवसेनेलाही हद्दपार करादेशातून राज्यातून जसे काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार केले तसे महापालिकेतूनही येथील जनतेनेही त्यांना हद्दपार करावे, असे आवाहन करत उरल्या सुरलेल्या शिवसेनेलाही हद्दपार करावे, असा टोलाही मंत्री खडसे यांनी लगावला.