शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

‘गोळीबार’ची एक इंचही जमीन धनदांडग्यांना मिळू देणार नाही

By admin | Updated: October 24, 2015 01:19 IST

एकनाथ खडसे यांचा इशारा : काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करण्याचे आवाहन

कोल्हापूर : पोलिसांच्या सरावासाठी असलेल्या गोळीबार मैदानावर कोणीतरी धनदांडगे नजर ठेवून हडप करण्याच्या प्रयत्नात आहेत; परंतु यातील एक इंचही जमीन त्यांना घेऊ देणार नाही, असा खणखणीत इशारा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे दिला.कसबा बावडा येथील गवत मंडई येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शामराव धोंडी पाटील होते. खडसे म्हणाले, कोल्हापूरकरांवर टोल लादणारेच आता टोलमाफीची मागणी करत आहेत; परंतु हा टोल आणला कुणी? आयआरबीला परवानगी दिली कुणी? त्यासाठी ठराव कुणी केला? राज्यात सत्ता असताना तो का घालविला नाही ?अशी विचारणाही त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला केली. हा टोल भाजपच घालविणार आहे. त्यासाठी सरकारच पैसे देईल, बंटी पाटील, पृथ्वीराज चव्हाण किंवा शरद पवार त्यासाठी पैसे देणार नाहीत.कसबा बावड्यातील माजी गृहराज्यमंत्र्यांच्या झुंडशाहीला सुरूंग लावा, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले. केंद्राच्या योजना शहरात आणण्यासाठी भाजपला सत्ता दिल्यास शहराचा कायापालट करू, असे ते म्हणाले. ‘हसनमियाँ’नी उमेदवारांची डिपॉझिट वाचवून दाखवावी‘हसनमियाँ’ जनतेला मूर्ख बनवायचे काम करत आहेत. एकाबरोबर ‘पैरा’ फेडण्याची भाषा करत ते महाडिकांच्या वळचणीलाही जाऊन बसतात. त्यांनी कसबा बावडा व कदमवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची डिपॉझिट वाचवून दाखवावी, असे आव्हान माजी महापौर सुनील कदम यांनी दिले. हसन मुश्रीफ यांच्यावर कदम यांनी चांगलेच तोंडसुख घेत ते प्रत्येकाबरोबर सेटलमेंट करतात, असा आरोपही केला.रमणमळा तलावाची जागा बंटी, मुश्रीफ यांनी घशात घातलीरमणमळ्यातील तलावाची शासकीय जागा माजी गृहराज्यमंत्री बंटी पाटील यांनी घशात घातली आहे. त्यातील १५ हजार स्क्वेअर फूट जागाही हसन मुश्रीफ यांनी लाटली आहे. त्या जागेवरील सात बारावर मुश्रीफ यांच्या मुलाचे नाव आहे. हे सर्व सात बारे आपण काढले असून ते चौकशीसाठी मंत्री खडसे यांना देणार आहे, असा घणाघाती आरोप सुनील कदम यांनी केला. गोळीबार मैदानावरील पोलिसांचा सराव का थांबला? हे मैदान कोणी घशात घातले? अशी विचारणा करत जागा हडपणाऱ्यांना हद्दपार करा, असे आवाहनही त्यांनी केले.