ते म्हणाले, १९८८ मध्ये भिशीच्या व्यवसायातून सुरू झालेल्या या पतसंस्थेच्या सध्या १८ संगणकीकृत शाखा असून संस्थेची सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. संस्था ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरल्याने संस्थेच्या ठेवीमध्ये सातत्याने वाढ होत असून, सध्या संस्थेने शंभर कोटी रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट पार केले आहे. तसेच कर्जवाटपामध्येही वाढ होऊन संस्थेने ७२ कोटी रुपये इतके कर्जवाटप केले आहे. संस्थेने ४१ कोटी रुपये इतकी गुंतवणूक इतर बँकांमध्ये केली आहे . तसेच गेल्या आर्थिक वर्षात संस्थेला १ कोटी २० लाख रुपयांचा नफा झाला आहे. पुढील चार वर्षांत १२५ कोटी ठेवींचा टप्पा पार करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
संस्थेकडून मृत सभासदांच्या वारसांना विशेष सवलत, आजारी सभासदांना मदतनिधी देण्याबरोबरच कर्मचारी, सभासद यांचा आरोग्य विमा उतरविला गेला असून, त्यांना तीन लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.