सतीश पाटील -- शिरोल सांगली फाटा येथे महामार्ग$ आणि कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात असते; पण येथे एकच दुपदरी उड्डाणपूल असून त्याखाली नेहमीच वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतो. चौकातील वाहने आणि वडापची वाहने यामुळे हा चौक कायम ठप्प झालेला असतो. कागल-सातारा महामार्गाचे चौपदरीकरताना शिरोली- सांगली फाट्याचे नियोजन काहीसे बिघडले आहे. या मार्गावरील एक महत्त्वाची बाजारपेठेचे आणि रहदारीचे ठिकाण असून येथे कागल -सातारा आणि सांगली- कोल्हापूर राज्य मार्ग एकत्र जुडतात. परिणामी येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा ताण असतो. महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन पेट्रोल पंप, हॉटेल व्यावसाय ,वाळू मार्केट, मार्बल मार्केट, मोठा ट्रान्सपोर्ट व्यवसाय, गावची वर्दळ याने हा परिसर गजबजलेला असतो. महामार्गावरील एक बाजूची वाहतूक ही उड्डाणपुलावरून तर दुसऱ्याबाजूची वाहतूक खालून होते अशी विचित्र स्थिती या चौकात आहे.चौपदरीकरणाचे काम करत असताना या ठिकाणाच्या रहदारी बाबतचा फारसा विचार झालेला दिसत नाही. नागांव फाटा ते सांगली फाट्यापर्यंत उड्डाणपूल होते, पण ते रद्द का केले हेच आज पर्यंत न उलगडलेले कोडे आहे. घाईगडबडीने एकेरी उड्डाणपूल केले, पण सध्या कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने वाहने जातात, याच मार्गावरून कोल्हापूरहून सांगलीला ही वाहने याच उड्डाणपूलाखालून पास होतात, तर सांगलीहून पुण्याकडे जाण्यासाठी धोकादायक उड्डाणपूल पास करावे लागते. अशा या तांगड्यामुळे पुलाखाली अपघात घडले आहेत. अतिशय चुकीच्या पद्धतीचा सांगली फाटा येथील उड्डाणपूल झाला असून दिवसभर वाहतूकीची कोंडी असते. तसेच रात्री चौकात अंधाराचे साम्राज्य पसरते आणि चालकांना अंदाजावर वाहन चालवावे लागते. सेवा रस्त्यांची दुरवस्थागोकुळ शिरगाव ते टोप संभापूरपर्यंत सेवा रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या पट्यात सलग सेवा रस्ते नाही. अनेक ठिकाणी सेवा रस्ते कट झालेले आहेत. त्यामुळे सेवा रस्ते तुकड्या तुकड्यात आहेत. त्यांचा दर्जा देखील अत्यंत सुमार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मुख्य महामार्गावरूनच येजा करावी लागते. टोप ते शिये फाटा येथे सेवा रस्ता नसल्याने मुख्य मार्गावरच वाहतुकीचा ताण असतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. सेवा रस्त्यांची डागडुजी देखील वरचेवर केली जात नाही.शिरोली सांगली फाटा येथील सध्याचे दुपदरी उड्डाणपूल अतिशय चुकीच्या पद्धतीने झाला आहे. कोल्हापूरकडून येणाऱ्या वाहनांना पुण्याकडे जाताना देखील खालील मार्गाचा वापर करावा लागतो. यामुळे चौकात वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतो. याठिकाणी सतत वाहतूक विस्कळीत असते. तसेच वरचेवर अपघात घडतात त्यामुळे सहापदरीच्या वेळी याठिकाणी उड्डाण पूल झालेच पाहिजे अन्यथा रस्ताच करून देणार नाही. - शशिकांत खवरे, माजी पंचायत समिती सदस्यधोकादायक नागाव फाटा चौकसांगली फाट्यावरील उड्डाणपुल जेथे संपतो तेथून काही मीटरवर नागाव फाटा आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा असलेला हा फाटा असुरक्षित असा आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आणि अत्यावश्यक सुविधांचा अभाव यामुळे हा चौक जीवघेणा ठरत आहे. येथे अपघातांचे प्रमाण देखील जास्त आहे. सांगली फाट्यावरील उड्डाण पूल हा आणखी पुढे पर्यंत होणे गरजेचे होते.
एकेरी उड्डाणपुलाने सांगली फाट्यावर गुंता
By admin | Updated: January 13, 2016 01:11 IST