शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

‘लोकमत’च्या कार्यालयात कोल्हापुरात भावी पत्रकारांनी केले एक दिवस काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 16:29 IST

कोल्हापूर : बालपण म्हणजे फुलपाखरी दिवस असतात. आई-वडिलांच्या छायेत आणि कोडकौतुकात वाढताना त्यांना सामाजिक विशेषत: लहान मुलांच्या प्रश्नांची जाणीव व्हावी या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात ‘लोकमत’च्या भावी पत्रकारांनी वृत्तपत्रांच्या कार्याची माहिती घेतली. शिवाय बालकल्याण संकुल सारख्य संस्थेत वाढणाऱ्या  मुलांचे आयुष्य जाणून घेतले. ‘लहान मुलांना काय कळतंय’ या गैरसमजुतीपलीकडे जावून त्यांच्या मनात उठणारे ...

ठळक मुद्देबालहक्क आणि कर्तव्यांची घेतली माहितीभावी पत्रकारांनी जाणून घेतले वृत्तपत्राचे काम

कोल्हापूर : बालपण म्हणजे फुलपाखरी दिवस असतात. आई-वडिलांच्या छायेत आणि कोडकौतुकात वाढताना त्यांना सामाजिक विशेषत: लहान मुलांच्या प्रश्नांची जाणीव व्हावी या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात ‘लोकमत’च्या भावी पत्रकारांनी वृत्तपत्रांच्या कार्याची माहिती घेतली. शिवाय बालकल्याण संकुल सारख्य संस्थेत वाढणाऱ्या  मुलांचे आयुष्य जाणून घेतले. ‘लहान मुलांना काय कळतंय’ या गैरसमजुतीपलीकडे जावून त्यांच्या मनात उठणारे हजारो विचारांचे आणि प्रश्नांचे काहूर त्यांच्याच शब्दांत मांडण्यात आले.आज, १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणनू सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्ताने बालहक्क, अधिकारांची वारेमाप चर्चा होत असताना ‘लोकमत’ने या विषयात सक्रिय पुढाकार घेत थेट शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या जाणीवा अधिक समृद्ध केल्या.

‘लोकमत’च्या शहर कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात आभास फौंडेशनचे अतुल देसाई, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वृत्तसंपादक चंद्रकांत कित्तूरे, मुख्य बातमीदार विश्वास पाटील, उपमुख्य उपसंपादक संदीप आडनाईक उपस्थित होते.

कोल्हापुर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेतलेले संस्कृती जाधव (सांगली), समृद्धी पाटील (केर्ली), वृषाली कदम (मुरगूड), मृणाल पाटील (खोची), गौतमी पाटील आणि शंभूराज भोसले (कसबा बावडा) तसेच कोल्हापूर शहरातील देविका बकरे, अक्षरा सौंदलगे, सार्थक कोळेकर, सानिका कुलकर्णी, विराज दिवे या विद्यार्थ्यांनी एक दिवस पत्रकाराच्या भूमिकेतून आपल्याभोवती घडलेल्या घटना शब्दबद्ध केल्या.

‘लोकमत’च्या शहर कार्यालयात सकाळी झालेल्या बैठकीत संपादक वसंत भोसले यांनी वृत्तपत्रांचे काम कसे चालते याबद्दल कुणाला माहिती आहे की किंवा तुमच्या मनात काय संकल्पना आहेत, असे विचारताच या भावी पत्रकारांनी आम्हाला लहानपणी वाटायचे की फोटो व बातम्या कागदावर चिकटवून त्या स्कॅन करत असतील अशी मजेशीर उत्तरे दिली. त्यानंतर आपल्या घरी सकाळी सकाळी येणाऱ्या वृत्तपत्रांचे काम कसे चालते, बातमीदार म्हणजे कोण, ते बातम्या कशा मिळवितात, बातमी कशी लिहिली जाते.

पाने कशी लावली जातात, छपाई कशी होते, मग वृत्तपत्र आपल्यापर्यंत कसे पोहोचते, लहान मुलांमध्ये केवळ मोबाईल गेमची क्रेझ असताना इंटरनेट, वर्तमानपत्रांचे आॅनलाईन एडिशन, दिवसभर होणारे अपडेट, क्षणार्धात आपल्यापर्यंत बातमी कशी पोहोचते, अशा उत्सुकतेला संपादक वसंत भोसले यांनी माहितीचे खतपाणी देऊन मुलांच्या विचारांना नवी दिशा दिलीच शिवाय आपणही समाजात घडणाºया घटनांबाबतच किती चौकस असले पाहिजे या कर्तव्याची जाणीव करून दिली.

बालहक्क समजून घ्या, व्यक्त व्हा : अतुल देसाई‘लोकमत’च्या कोल्हापूर शहर कार्यालयात आभास फौंडेशनचे संस्थापक आणि बालकल्याण संकुलाचे सदस्य अतुल देसाई यांनी या भावी महापत्रकारांना बालहक्क आणि कर्तव्य यांची माहिती दिली. अन्न, वस्त्र निवाऱ्यासह शिक्षण, खेळ, आरोग्य, सामाजिक सुरक्षितता, अन्याय अत्याचार सहन न करणे हे लहान मुलांचे हक्क आहेत. त्यांना बाधा पोहोचत असेल तर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे.

मोठ्या व्यक्तीने केलेला नकोसा स्पर्श, हावभाव, वागण्याची पद्धत या गोष्टीं तुमच्यासोबत घडत असतील तर सहन करत गप्प बसू नका तर तातडीने तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगा, व्यक्त व्हा, असा मौलीक सल्लाही त्यांनी दिली.

मोबाईल, इंटरनेट आणि टीव्हीच्या जमान्यात त्याच्या अतिवापराने होणारे दुष्परिणाम विशद करतानाच विद्यार्थ्यांनी आपले छंद जोपासणे, वाचन, मैदानी खेळ, शाळेतील विविध उपक्रमांत सहभाग घेणे, आत्मविश्वासाने वावरणे या गोष्टींचे शालेय जीवनात असलेले महत्त्व आणि त्यांचे भविष्यात होणारे फायदे याची अगदी साध्या सोप्या शब्दांत केलेल्या मांडणीमुळे मुलांना मोबाईलमुळे होणाºया गंभीर परिणामांची जाणीव झाली.

बालकल्याण संकुलची भेट : अनुभवाचे संचितआपण सकाळी उठलो की आई हातात ब्रश आणून देते, चमचमीत पदार्थ, पोळीभाजीचा डबा तयार होतो, बाबा बॅग भरून तयारी करून देतात, मनातल्या सगळ्या फर्माईशी क्षणार्धात पूर्ण करत आपले कोडकौतुक होते; पण काही बाळांच्या आणि मुलांच्या वाट्याला या गंधकोशातल्या बालपणाऐवजी काटेरी अनुभव येतात.

कधी रस्त्यावर, कधी मंदिरात, कधी नदी-ओढ्याच्या काठाला सापडलेली एक दिवसाची बाळं, परिस्थितीने अनाथपण आलेले मुलं-मुली कुणाकडे हट्ट करत असतील? ते कुठे राहत असतील याचा विचारही कधी आपल्या मनात येत नाही.

आपण जगत असलेल्या सुरक्षित वातावरणापलीकडेही असे एक जग आहे जिथे लहान मुलांचे बालपण उमलण्याआधीच कोमेजते; पण त्यांच्यातले बालपण जपून मायेचा आधार देणाऱ्या  मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुल या संस्थेची भेट म्हणजे या भावी पत्रकारांचे डोळे वास्तवाच्या प्रकाशाने उघडले. दुपारी बालकल्याण संकुलच्या आवारात येताच अधीक्षक पी. के. डवरी यांनी या बालचमूचे स्वागत केले.

अगदी शून्य ते वयाच्या अठरा वर्षांपुढील मुलींचे तसेच मुलांचाही सांभाळ करणाऱ्या  विविध विभागांची माहिती दिली. पाळण्यात खेळत असलेली निरागस बाळं बघताना डोळ््यांच्या कडा ओलावत ‘आई-वडील कसे काय इतक्या गोड मुलांना टाकून देतात’, असे भावोद्गार या मुलांच्या तोंडून निघाले.

लहान मुलं कशी सापडतात, ते संस्थेपर्यंत कशी येतात, त्यांना कोण सांभाळतं, त्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेतं, या बाळांचे पुढे काय होते, ते दत्तक कसे दिले जातात, एखाद्या मुलाला घरात त्रास होत असेल, मानसिक शारिरीक छळ होत असेल तर ते संस्थेत येऊ शकतात का, त्यांना परत घरी जायचे असेल तर काय, आई आपले मुल परत घेऊन जाऊ शकते का, अल्पवयीन मुलाने चोरी, खुनासारखे गुन्हे केले तर ते संस्थेत कसे दाखल होतो, त्यांना कशी वागणूक दिली जाते, त्यांचे पुढे काय होते, मुलांचा खर्च कोण अत्याचारित मुलगी किंवा महिला संस्थेत राहू शकतात का अशा बालमनाच्या असंख्य प्रश्नांना आभासचे अतुल देसाई, संस्थेच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले, अधिक्षक पी. के. डवरी यांनी अगदी उदाहरणासहीत माहिती दिली.

संस्थेत सगळ््या सोयी-सुविधा असतात पण मायेचा प्रेमाचा ओलावा देणारे आई-वडील नसतात अशा स्थितीत मुलांचा भावनिक संघर्ष समजावून घेऊन त्यांना योग्य दिशा देण्याचे काम समुपदेशक आणि बालसमिती करत असते अशी माहिती अतुल देसाई यांनी दिली.

संस्थेतील एक तासाच्या भेटीनंतर आपण पालकांकडे अनावश्यक कारणांसाठी हट्ट करतो, कधी रूसतो, चिडतो पण या मुलांना काय वाटत असेल असा विचार मांडत आम्ही यापुढे पालकांशी वागताना याचे भान नक्की राखू, अशी ग्वाहीही नकळत दिली.प्रत्यक्ष पान लावण्याचा घेतला अनुभवलोकमत’च्या कोल्हापूर शहर कार्यालयात महाराष्ट्राच्या या भावी पत्रकारांनी लोकमतच्या दैनंदिन कामकाजाबद्दल असलेली जिज्ञासा पूर्ण करुन घेतली. लोकमतमधील एक पान लावण्याची संधी या मुलांना देण्यात आली होती.

‘लोकमत’च्या शहर कार्यालयात सकाळी झालेल्या बैठकीत संपादक वसंत भोसले यांनी वृत्तपत्रांचे काम कसे चालते याबद्दल माहिती दिली. लोकमतचे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी प्रत्यक्ष अंकात बातमी प्रसिध्द होण्यापूर्वीची प्रक्रिया समजावून सांगितली.

यानंतर प्रत्येक बालपत्रकाराने दैनिकातील काम कसे चालत असेल याबद्दल आपल्या मनात असलेल्या पूर्वकल्पना कशा चुकीच्या होत्या, याबद्दल सांगितले. या विद्यार्थ्यांनी आभास फौंडेशनचे अतुल देसाई यांनी सहज आणि सोप्या भाषेत सांगितलेल्या बालहक्क आणि कर्तव्याबद्दलची माहिती समजावून घेतली.

मी कसबा बावड्यातील प्रिन्स शिवाजीनगर कॉलनीत राहते. तिथे सगळे लोक ‘लोकमत’च घेतात. मला शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळाल्याची बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली. कॉलनीतील लोकांनी माझे घरी येऊन अभिनंदन केले. त्याचा मला खूप आनंद वाटला, असा अनुभव गौतमी पाटील हिने सांगितला.भावी पत्रकार म्हणून या उपक्रमात सहभागी झालेली मुले चौकस, उत्तम निरीक्षण क्षमता असलेली व हुशार होती. अकरापैकी नऊ मुलांमुलींनक पोहता येत होते. बहुतेक सर्वजण सायकलचा वापर करतात. वाचायला काय आवडते, असे विचारल्यावर एका मुलीने मला

टॅग्स :children's dayबालदिन