शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

राजघराणे महिन्यातील एक दिवस जनतेला देणार

By admin | Updated: August 5, 2014 23:42 IST

राजेसाहेब खेमसावंत : लोकाग्रहास्तव निर्णय

सावंतवाडी : श्रीमंत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज तसेच शिवरामराजे भोसले हे जसे जनतेला भेटून त्यांच्या सुखदु:खात सहभागी होत होते तसे आता राजेसाहेब खेमसावंत भोसले करणार आहेत. लवकरच ते महिन्यातील एक दिवस जनतेसाठी उपलब्ध करून देणार आहेत, अशी घोषणा त्यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार शिवराम दळवी उपस्थित होते.श्रीमंत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व श्रीमंत शिवरामराजे भोसले हे प्रजेमध्ये जात. त्यांची सुख दु:खे जाणून घेत असत. राजे येणार म्हटल्यावर लोकांमध्ये प्रचंड उत्साह असे. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात राजे गेले की, त्यांची मोठी उठबस होत असे. प्रत्येकजण आपला राजा आला, असे म्हणत त्यांच्या प्रत्येक कामात हातभार लावत असे. मात्र, गेली कित्येक वर्षे जनता व राजघराणे यांच्यातील संपर्क थोडासा कमी झाला आहे.आजही अनेक भाविक पाटेकर देवस्थानात येत असतात. त्यावेळी ते पाटेकर मंदिरात जाऊन आल्यावर राणीसाहेब सत्वशीलादेवी भोसले यांच्याकडे नतमस्तक होतात. हजारो ग्रामस्थ राजवाड्यात येतात. त्याशिवाय बाहेरील पर्यटक राजवाड्यातील गंजिफासारखी कला पाहण्यास आले की, राजघराण्यापुढे आवर्जून नतस्मतक होतात. पण आता माजी आमदार शिवराम दळवी तसेच अनेक नागरिकांच्या आग्रहास्तव राजे खेमसावंत भोसले हे लोकांना भेटणार आहेत. याबाबतचा दिवस ते लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राजे खेमसावंत हे पुन्हा एकदा आपल्या प्रजेत जाणार असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत राजेसाहेब खेमसावंत भोसले यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, लोकांमध्ये जायला आवडेल. आम्ही लोकांसाठी असल्यामुळे लोकांच्या समस्या जाणून घेऊ. २५ आॅगस्टच्या पाटेकर मंदिरातील कार्यक्रमाला स्वत: उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात अनेकजण भेटतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.सावंतवाडी संस्थानाने विशेषत: बापूसाहेब महाराजांनी १२ बलुतेदारांना संस्थानमध्ये मानाचे स्थान देऊन उभ्या महाराष्ट्रात नवा इतिहास घडवला आहे. त्यांचे कार्य श्रीमंत शिवरामराजे यांनीही सुरू ठेऊन इतिहास घडवून आणला. त्यांचे हे कार्य खेमसावंत भोसले सुरू ठेवणार आहेत. संस्थानच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाज घटकांना शासनाने दिलेल्या आरक्षणाचा लाभ होण्यासाठी आरक्षण जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे, असे शिवराम दळवी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)