शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवस आरोग्यासाठी, घालूया सूर्यनमस्कार...

By admin | Updated: February 11, 2016 00:33 IST

‘लोकमत’चा उपक्रम : शनिवारी शहाजी लॉ कॉलेजच्या प्रांगणात सामुदायिक सूर्यनमस्कार

कोल्हापूर : दैनंदिनी कामाच्या व्यापात शारीरिक व्यायामाचा अभाव, सततची धावपळ, ताणतणाव, खाण्यातील अनियमितपणा यामुळे काही ना काही व्याधी जडल्या की मग व्यायाम करायला पाहिजे, याची खात्री पटते. या संदर्भात अधिकाधिक जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने ‘लोकमत’च्या पुढाकाराने ‘एक दिवस आरोग्यासाठी सूर्यनमस्कार’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावर शनिवारी (दि. १३) सकाळी ६.३० वाजता हा उपक्रम होत असून यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. सूर्यनमस्कार ही भारतीय आरोग्यशास्त्राने संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे. घरच्या घरी, कमी वेळात होणारा, बिनखर्चाचा, कमी जागेत व इतर साधनांव्यतिरिक्त सूर्यनमस्कार घालता येऊ शकतो. आबालवृद्धांसह महिलाही या व्यायामाद्वारे आपले शरीर सुदृढ करू शकतात. त्यासाठी कुठल्या विशिष्ट आहाराची किंवा डाएटिंगची गरज नाही. या व्यायामाची सवय लोकांना लागावी या उद्देशाने घेण्यात आलेला हा उपक्रम सर्वांसाठी खुला आहे. तसेच माधवबाग क्लिनिक्सच्या वतीने ‘निरोगी हृदय’ या विषयावर तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमात सहभागी प्रत्येक व्यक्तीला ‘माधवबाग’तर्फे हार्ट रेट, ब्लड फ्रेशर, ईसीजी तपासणी मोफत करण्याचे कुपन दिले जाणार आहे. तसेच ‘लोकमत’तर्फे सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी ‘माधवबाग क्लिनिक्स्ा’ हे मुख्य प्रायोजक आहेत, तर पतंजली योग समिती यांच्या सहकार्याने हा उपक्रम होत आहे. ‘माधवबाग’मध्ये हृदयरोगावर विनाशस्त्रक्रिया उपचार केले जातात. महाराष्ट्रात यांची १३० क्लिनिक्स आहेत. आतापर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांनी या क्लिनिक्सचा लाभ घेतला आहे. या उपक्रमात कोणत्या शाळा, महाविद्यालय किंवा ग्रुपला सहभागी व्हायचे असेल तर ‘लोकमत’च्या लक्ष्मीपुरी येथील शहर कार्यालयात किंवा सचिन ९७६७२६४८८५ यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)