शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

पंचवीस लाखांच्या बदल्यात जुने एक कोटी

By admin | Updated: July 16, 2017 01:02 IST

आयकर विभागाचे सहायक संचालक विजय नेटके आणि आयकर अधिकारी प्रकाश मोहिते हे या जुन्या नोटांची चौकशी करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरोली : शिरोली-सांगली फाटा येथे सापडलेल्या जुन्या नोटांचा सौदा एक कोटी जुन्या नोटांच्या बदल्यात पंचवीस लाखांच्या नवीन नोटा असा सौदा ठरल्याचे तपासात पुढे आले आहे. करवीरचे पोलीस उपाधीक्षक सूरज गुरव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गुरव म्हणाले, जुन्या नोटांची देवघेव होणार असल्याची माहिती पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शिरोली पोलिसांनी सापळा रचला होता. परेल, मुंबई येथील किशोर गांधी यांचे स्नेही कोल्हापूरमध्ये आहेत. या संबंधित स्नेहीने गांधीनगरच्या कलमेश दुंबानी याला गाठून गांधी याच्याशी बोलणे करून दिले होते. पंधरा दिवसांपासून गांधी आणि दुंबानी यांचा सौदा ठरविण्याबाबत फोनवरून बातचित सुरू होती. एक कोटीला पंचवीस लाख देण्याचे ठरल्यावर गांधी हा जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आला होता. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता गांधी हा सांगली फाटा येथे आला. गांधी हा शिरोली-सांगली फाटा येथे पाठीला जुन्या नोटांची काळी बॅग अडकवून संशयितरीत्या फिरत होता. काही वेळाने दुंबानी हा तेथे आला. दोघांचा पैसे बदलून घेण्यासाठी व्यवहार सुरू असताना पोलिसांनी या दोघांना पकडले. त्यांच्याकडून जुन्या चलनातून बाद झालेले सुमारे एक कोटी रुपये जप्त केले. आयकर विभागाचे सहायक संचालक विजय नेटके आणि आयकर अधिकारी प्रकाश मोहिते हे या जुन्या नोटांची चौकशी करीत आहेत. पत्रकार परिषदेला शिरोलीचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, वसंत पिंगळे, दिगंबर रसाळ, अविनाश पोवार उपस्थित होते.