शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

‘महसूल’चे दीड हजार अधिकारी-कर्मचारी निवडणुकीत, कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 12:52 IST

लोकसभा निवडणुकीच्या कामात महसूल विभागातील सुमारे दीड हजार कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंतचे सर्व अधिकारी व कर्मचारी या कामात असल्याने अत्यावश्यक असलेल्या पुरवठा विभागाच्या कामासह दाखले, सातबारे, शस्त्र परवाने, जमीनविषयक कामांवर परिणाम झाला आहे. जवळपास तीन महिने येथील कामकाज ठप्प राहण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्दे‘महसूल’चे दीड हजार अधिकारी-कर्मचारी निवडणुकीत, कामकाज ठप्पपुरवठा, दाखल्यांच्या कामावर परिणाम

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या कामात महसूल विभागातील सुमारे दीड हजार कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंतचे सर्व अधिकारी व कर्मचारी या कामात असल्याने अत्यावश्यक असलेल्या पुरवठा विभागाच्या कामासह दाखले, सातबारे, शस्त्र परवाने, जमीनविषयक कामांवर परिणाम झाला आहे. जवळपास तीन महिने येथील कामकाज ठप्प राहण्याची चिन्हे आहेत.लोकसभा निवडणूक हे राष्ट्रीय कार्य असल्याने महसूलसह सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी करावी लागते. महसूल विभागातील जवळपास शंभर टक्के अधिकारी व कर्मचारी हे या कामात आहेत.

निवडणूक कामात महसूल विभाग हा महत्वाचा भाग असल्याने सर्व प्रमुख जबाबदाºया या विभागावरच असतात. त्यामुळे जवळपास सर्वच स्टाफ हा निवडणुकीच्या कामासाठी सक्रिय ठेवला जातो. निवडणुकीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने ‘महसूल’मधील इतर कामांकडे पाहण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळ नाही.

त्यामुळे पुरवठा विभागातील दैनंदिन कामांसह महसूलमधील दाखले, सातबारे, जमीनविषयक परवाने यांची कामे ठप्प झाली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व प्रांताधिकारी कार्यालये, तहसीलदार कार्यालये, तलाठी कार्यालयांमध्ये इथून पुढे जवळपास तीन महिने असेच चित्र राहणार असल्याचे चित्र आहे.

निवडणूक कामातील अधिकारी व कर्मचारी

  • उपजिल्हाधिकारी - १२
  • तहसीलदार - २१
  • नायब तहसीलदार - ४०
  • लेखाधिकारी - २
  • सहा.लेखाधिकारी - २
  • लघुलेखक (निन्मश्रेणी) - ५
  • उपलेखापाल - ३
  • मंडल अधिकारी - ७२
  • अव्वल कारकून - १८२
  • लिपिक - २४५
  • वाहनचालक - २२
  • तलाठी - ४००
  • शिपाई - १२४
  • कोतवाल - ४००

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूर