शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाचगावमध्ये दीड लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST

कोल्हापूर : पहिल्या मजल्यावर सहकुटुंब झोपले असताना अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास तळमजल्यातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील सुमारे दीड ...

कोल्हापूर : पहिल्या मजल्यावर सहकुटुंब झोपले असताना अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास तळमजल्यातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील सुमारे दीड लाखांचा ऐवजावर हात साफ केला. पाचगाव (ता. करवीर) येथील सहजीवन हौसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये रोकड व सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. याबाबत गुरुदत्त प्रकाश शिंदे यांनी करवीर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. त्याच परिसरात आणखी दोन ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला, पण तेथे त्यांच्या हाती काहीही लागले नसल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाचगाव येथे सहजीवन हौसिंग सोसायटीमध्ये गुरुदत्त शिंदे हे राहतात. शनिवारी मध्यरात्री जेवण करुन सहकुटुंब ते पहिल्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने तळमजल्यातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आतील तिजोरीतील दीड तोळ्याचा सोन्याचा लक्ष्मीहार, पुष्कराज खडा असलेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी, पाचूचा खडा असलेली साडेसात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, दोन ग्रॅमची सोन्याची नथ तसेच साडेआठ हजाराची रोकड असा सुमारे १ लाख ५४ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. शिंदे हे सकाळी उठल्यानंतर तळमजल्यावर आल्यानंतर त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले, त्यांनी आत जाऊन पाहिले असता तिजोरीसह कपाटातील कपड्यासह इतर साहित्य विस्कटले होते. त्यानंतर घरफोडीचा प्रकार उघड झाला. घटनेनंतर करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, करवीर पोलीस ठाण्यातील सपोनि विवेकानंद राळेभात आदींनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. त्यानंतर डॉग स्कॉट व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते, पण चोरट्यांचा माग निघाला नाही. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात घरफोडीची नोंद झाली आहे.

दरम्यान, याच परिसरात चोरट्यांनी आणखी दोन ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही.