शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळा परिसरातील दीड एकर जागा देवस्थानच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची शहरातील रंकाळा परिसरातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोरील पिवळ्या पट्ट्यातील ५९ गुंठे (दीड ...

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची शहरातील रंकाळा परिसरातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोरील पिवळ्या पट्ट्यातील ५९ गुंठे (दीड एकर) जागा समितीने गुरुवारी ताब्यात घेतली. ही जमीन अनेक वर्ष शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिली होती. आता तिथे दोनशे बेडचे सुसज्ज भक्त निवास बांधण्यात येणार आहे.

देवस्थान समितीच्या हजारो एकर जमिनी असून, त्यापैकी अनेक जमिनींवर अतिक्रमण झाले आहे, काही जमिनींच्या वापरासंबंधी शर्तभंग झाला आहे. रंकाळ्याजवळील ही जागा अनेक वर्षे एका शेतकऱ्याला कसण्यासाठी दिली होती. समितीने या जागेचा ताबा देवस्थानकडे परत देण्याची मागणी केली होती. मात्र, संबंधितांनी ताबा देण्यास नकार दिला, त्यामुळे तत्कालीन अध्यक्ष महेश जाधव यांच्या काळात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्याविरोधात शेतकऱ्याने न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र न्यायालयाने यावर स्थगिती आणण्यास नकार दिला. अखेर गुरुवारी तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांनी जागा रितसर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ताब्यात दिली. त्याची कागदपत्रे सचिव विजय पोवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी विशेष प्रकल्प अभियंता सुदेश देशपांडे, उपअभियंता सुयश पाटील, लिपिक मिलिंद घेवारी, मंडल अधिकारी व देवस्थान समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

--

फोटो नं २९०७२०२१-कोल-देवस्थान

ओळ : कोल्हापुरातील रंकाळा परिसरातील दीड एकर जागा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने गुरुवारी ताब्यात घेतली. सचिव विजय पोवार यांच्याकडे जमिनीची कागदपत्रं सुपूर्द करण्यात आली.

----