शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

यड्रावमध्ये वृद्धांचा झाडू मोचा

By admin | Updated: November 25, 2014 00:00 IST

मागण्या शासनस्तरावर पोहोचविण्याचे आश्वासनर्

यड्राव : राष्ट्रीय वृद्ध सेवाश्रम संघाच्यावतीने प्रत्येक वृद्धाला तीन हजार पेन्शन मिळावी, यासह इतर मागण्यांसाठी तलाठी कार्यालयावर झाडू मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन तलाठी ए. एस. कुंभार यांनी स्वीकारले व सर्व मागण्या शासन स्तरावर पोहोचवून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.येथील निराधार वृद्ध महिला, विधवा महिला, भूमिहीन शेतमजुरांच्या न्याय्य हक्कासाठी व स्वच्छ भारत अभियानाचे औचित्य साधत स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यासाठी झाडू मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतीपासून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चामध्ये सहभागी महिलांनी हातात झाडू घेतला होता. ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’च्या घोषणा महिलांनी दिल्या.तलाठी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी संघाचे सचिव संतोष कांबळे यांनी वृद्धांना तीन हजार रुपये पेन्शन, वृद्ध निराधार, विधवा, अपंग यांच्या मासिक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी करावी, यांसह विविध मागण्यांचे निवेदन वाचून दाखविले. हे निवेदन तलाठी ए. एस. कुंभार यांना दिले. याप्रसंगी सरपंच सरदार सुतार उपस्थित होते. सदरच्या मागण्या शासन स्तरापर्यंत पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन कुंभार यांनी दिले.मोर्चामध्ये श्रीमती सुरेखा काटकर, इस्माईल ऐनापुरे, चंदाताई पाटील, राधाताई कांबळे, संतोष कांबळे, आप्पासाहेब आदमाने, तम्मान्ना बेल्याळ, बाजीराव आदमाने यांच्यासह सुमारे साठ महिलांचा सहभाग होता. (वार्ताहर)