शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’ही स्वीकारणार जुन्या नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 01:08 IST

२४ पर्यंत मुदत : थकीत करांसह सर्व कर स्वीकारणार - पवार

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही वीज वितरण, बीएसएनएल, स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे थकीत कर, व्यवसाय कर, सर्व दंड, नोंदणी शुल्क आदी स्वीकारण्याचे आज, शनिवारपासून धोरण स्वीकारले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी दिली. यामध्ये नूतन खरेदी वाहन नोंदणी कर, पर्यावरण कर, आंतरराज्य परवाना शुल्क, थकीत कर, चालू व्यवसाय कर, फॅन्सी नंबर, व्हीआयपी नंबर शुल्क, जुने थकीत कर आदींचा समावेश आहे. या कर व शुल्कापोटी १००० व ५०० च्या जुन्या नोटा कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड या कार्यालयांमध्ये स्वीकारल्या जाणार आहेत. शनिवारी (दि. १९) ते गुरुवारी (दि. २४) तारखेपर्यंत या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या महसुलासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही जादाचा कर्मचारी वर्ग या कामी नेमला आहे. प्रतिदिन सुमारे २० लाखांपर्यंतचा महसूल हे कार्यालय गोळा करत होते.मात्र, ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातल्यापासून या कार्यालयात प्रतिदिन २० हजार इतकाच महसूल गोळा होऊ लागला होता. त्यात आता नव्या केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सहसचिव अभय दामले यांनी १४ नोव्हेंबरला एका आदेशाद्वारे जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश या कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार शनिवार(दि. १९)पासून स्वीकारली जाणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ जास्तीत वाहनधारकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले. राज्य शासनाच्या अन्य खात्यांनी करापोटी जुन्या ५०० व १००० च्या नोटा स्वीकारल्या होत्या. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही या नोटा स्वीकारणे अपेक्षित होते. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सहसचिव अभय दामले यांनी दि. १७ ला आदेश दिल्यानंतर तत्काळ नोटा स्वीकारण्यास सुरुवात करणे अपेक्षित होते तरी ही कसर सुटीतही ‘विशेष कक्ष’ स्थापून भरून काढावी.- सुभाष जाधवअध्यक्ष, जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशन