लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील केकतवाडी येथे पाझर तलावात बुडून वृद्धाचा मृत्यू झाला. पांडुरंग नारायण कळंत्रे (वय ७३) असे त्यांचे नाव आहे. गुरुवारी दुपारी ते तलावात बुडल्याचे दिसून आले. त्यांना बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
यादवनगरात तरुणास मारहाण
कोल्हापूर : किरकोळ वादातून यादवनगरात तरुणास मारहाण केली. भूषण महेश भोसले (वय ३०) असे जखमीचे नाव आहे. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.
वाहनाची महिलेला धडक
कोल्हापूर : तिसंगी (ता. गगनबावडा) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जखमी झाली. छाया केशव कांबळे (वय ५५) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.
शाहूपुरीत तरुणास मारहाण
कोल्हापूर : अज्ञाताने केलेल्या मारहाणीत फैयाज सलिम अन्सारी (वय २७) हा तरुण जखमी झाला. शाहूपुरी आठवी गल्लीत हा प्रकार घडला. जखमीवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.