शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंत्ययात्रेत वृद्धा झाली जिवंत!

By admin | Updated: April 9, 2016 01:02 IST

कुडित्रेतील घटना : खांदेकरी मुलाला झाली श्वास सुरु असल्याची जाणीव

कोपार्डे : अपघातात गंभीर जखमी झालेली वृद्धा उपचाराला साथ देत नसल्याने डॉक्टरांनी घरी नेण्यास सांगितले. ती कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला. धार्मिक विधी पार पडल्यानंतर अंत्ययात्रा सुरू झाली. स्मशानभूमी आता टप्प्यात आली असतानाच त्या वृद्धेचा श्वास सुरू असल्याचे खांदेकरी असलेल्या तिच्याच मुलाच्या लक्षात आले आणि अंत्ययात्रेतील सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला आणि एकच गोंधळ उडाला. वनिता पांडुरंग भास्कर (वय ६०) असे या वृद्धेचे नाव आहे.ही घटना शुक्रवारी दुपारी कुडित्रे (ता.करवीर जि.कोल्हापूर ) येथे घडली. गुढीपाडव्याच्या दिवशीच या घटनेने दु:खाची जागा सुखाने घेतल्याचा अनुभव आला.वनिता भास्कर गुरुवारी आपला मुलगा पिंटू भास्करबरोबर मोटारसायकलवरून गणपतीपुळे, पावस या ठिकाणी देवदर्शनाला गेल्या होत्या. परतत असताना पाचल-राजापूर दरम्यान रस्त्यावर असणाऱ्या गतीरोधकावर वनिता भास्कर यांचा तोल गेल्याने रस्त्यावर पडून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांचा मुलगा पिंटूने स्थानिकांच्या मदतीने त्यांना प्रथम कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून एका खासगी रूग्णालयात त्यांना हलविण्यात आले. तेथेही डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र, शुक्रवारी सकाळपासून त्या उपचाराला साथ देत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांना घरी आणले. रुग्णालयात व घरी आणल्यानंतरही वनिता या कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला. अंत्ययात्रा सुरू झाली, थोड्या अंतरावर गेल्यानंतर खांदा देणाऱ्या त्यांच्या मुलग्याला आईचा श्वासोच्छ्वास सुरू असल्याचे लक्षात आले. त्यांनी आपल्या नातेवाइकाला याची कल्पना दिली. त्यामुळे अंत्ययात्रा थांबवून श्वासोच्छ्वास सुरू असल्याची खात्री अनेकांनी करून घेतली. त्यानंतर वनिता या जिवंत असल्याचे लक्षात आल्याने तेथूनच त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. आता त्या उपचाराला साथ देत असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. (वार्ताहर)