शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाईन फूड’ने ६०० जणांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:11 IST

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मोबाईलद्वारे अथवा आॅनलाईन नोंदणीनंतर अवघ्या काही मिनिटांत गरमागरम जेवण, नाष्टा, तर ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मोबाईलद्वारे अथवा आॅनलाईन नोंदणीनंतर अवघ्या काही मिनिटांत गरमागरम जेवण, नाष्टा, तर इलेक्ट्रॉनिक, गृहोपयोगी, आदी वस्तू एक-दोन दिवसांत घरबसल्या अथवा नोंदणी केलेल्या ठिकाणावर उपलब्ध होते. या आॅनलाईन फूड आणि लॉजिस्टिक डिलिव्हरीने कोल्हापूरमधील सुमारे ६०० तरुणांच्या हाताला काम दिले आहे.सध्या बहुतांश क्षेत्रात आॅनलाईन कामावरील भर वाढला आहे. हॉटेल इंडस्ट्रिजमधील आॅनलाईन फूड डिलिव्हरी देण्याचे प्रमाण वाढत आहे. मुंबई, पुण्यानंतर आता त्या पद्धतीची सुविधा देणाऱ्या कंपन्यांचे कोल्हापुरातून काम सुरू झाले आहे. सध्या जेवण, नाष्टा, आईस्क्रीम, पिझ्झा, आदी खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू ग्राहकांना घरपोच करणाºया चार कंपन्यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे ६०० तरुण कार्यरत आहेत. त्यामध्ये आॅनलाईन फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्के आहे. फूड डिलिव्हरी करणाºया संबंधित कंपन्यांकडे नोंदणी शुल्क भरल्यानंतर त्यांच्याकडून काम करणाºया तरुणाला दोन टी-शर्ट, बॅग दिली जाते. हे काम करण्यासाठी मोबाईल, दुचाकी आणि फूड लायसन तरुणाकडे असणे आवश्यक आहे. त्यांना कमिशन तत्त्वावर मोबदला मिळतो. पेट्रोल भत्ता मिळत नाही. साधारणत: दरमहा १२ ते १८ हजार रुपयांची कमाई होते. वस्तू पोहोचविण्याचे काम करणाºयाला ‘डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह’, तर खाद्यपदार्थ पोहोचविणाºया कर्मचाºयाचा ‘डिलिव्हरी पार्टनर’ असा उल्लेख केला जातो. आपल्या सोयीनुसार काम करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने रोजगाराच्या या नव्या क्षेत्राला तरुणाई पसंती देत आहे. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असून, ते वाढत आहे.काम आणि मोबदला असाग्राहकाने त्याला हवे असणारे जेवण, नाष्टा अथवा वस्तंूचे आॅनलाईन पेमेंट करून अथवा ‘कॅश आॅन डिलिव्हरी’ची नोंदणी संबंधित कंपन्यांचे संकेतस्थळ, दूरध्वनी अथवा मोबाईल अ‍ॅपद्वारे केल्यानंतर त्याबाबतचा संदेशसंबंधित हॉटेल, कंपनी आणि तरुणाच्या मोबाईलवर जातो.ज्या हॉटेलमधून मागणी केली आहे. त्या परिसरातील डिलिव्हरी पार्टनरच्या मोबाईलवर संदेश जातो; त्यामुळे शहरातील विविध हॉटेल परिसरात दुपारी एक आणि सायंकाळी सहानंतर डिलिव्हरी पार्टनरची गर्दी दिसते.या संदेशामध्ये संबंधित मागणी कुठे पोहोच करावयाची त्याचा उल्लेख असतो; त्यासाठी १० ते १५ मिनिटांची वेळ असते. दुपारी एक ते तीन आणि सायंकाळी सहा ते रात्री साडेदहा या वेळेत ग्राहकांची मागणी असते.खाद्यपदार्थांच्या प्रत्येक मागणीवर, तर वस्तूवर त्या तरुणाला १३ ते २५ रुपयांपर्यंत कमिशन मिळते. मागणीचा ठरावीक आकडा पूर्ण झाल्यानंतर कंपनीकडून प्रोत्साहन म्हणून अतिरिक्त रक्कम दिली जाते.