कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील एव्हीएच विरोधी सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चाला सामोरे जाण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आलेले ‘प्रदूषण’चे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून पळ काढला. गेट ढकलून आत येण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आंदोलकांना पाहून प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी एस. एस. डोकेंसह कर्मचाऱ्यांनी कार्यालयापर्यंत पळत आसरा घेतला.उत्पादन बंद करण्याचा आदेश मिळाल्याशिवाय येथून जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली, पण शेवटी आदेशाविनाच आंदोलन थांबविण्यात आले. कृती समितीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाच्यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी ११ वाजताच उद्योग भवन समोरील रस्ता दोन्हींकडे बॅरेकटस लावून पोलिसांनी बंद केला होता. परिणामी उद्योग भवनातील विविध कार्यालयांत जाणाऱ्यांची गैरसोय झाली. आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली डोके यांची भेट घेतली. चर्चेत डोके यांच्याकडून ठोस काही हाती लागले नाही. नकारात्मकतेमुळे शिष्टमंडळाने डोके यांना तुम्हीच आंदोलकांना उत्पादन बंद करण्याचा अधिकार मला नाही असे सांगा, असे आग्रह करू लागले. सुरुवातीला डोके यांनी आढेवेढे घेतले. शिष्टमंडळातील अॅड. संतोष मळवीकर डोके यांना खुर्चीवरून उचलून नेण्यासाठी जवळ गेले असता पोलिसांनी त्यांना त्वरित रोखले. आता आपली काही सुटका नाही, असे लक्षात येताच डोके यांनी आंदोलकांसमोर येण्याची कबुली दिली. शिष्टमंडळाने डोके यांच्यासोबत सर्वच कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयास कुलूप लावले.डोके पोलिसांच्या बंदोबस्तात आले. ते हातात माईक घेऊन एव्हीएच प्रकल्पाचे उत्पादन बंद करणे माझ्या हातात नाही, वरिष्ठांना माहिती देतो, असे सांगताच आंदोलक अतिशय आक्रमक झाले. गेट ढकलून ते डोकेंच्या दिशेने येऊ लागले. हे लक्षात येताच डोकेंसह सोबत आलेले अधिकारी, कर्मचारी पळून कार्यालयात घुसले. (प्रतिनिधी)पोलीस वाहन अडविले..आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी वाहन आणले. आंदोलकांना पोलिसांनी वाहनात घातले. दरम्यान, ताब्यात घेतला की सोडायचे नाही, असे म्हणत काही आंदोलकांनी पोलिसांचे वाहन रोखून धरले. पोलीस निरीक्षकांच्या वाहनाच्या समोर एक तरुण चक्क झोपला. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. अर्धा तासानंतर पोलीस वाहन मार्गस्थ झाले. डोके यांना झापले..डोके यांनी मग्रुरीने पाच जिल्'ांचा अधिकारी असल्याचे आमदार क्षीरसागर यांना सांगितले. यावर क्षीरसागर प्रचंड संतापले. त्यांनी चढ्या आवाजात कोणाशी तुम्ही बोलताय, एका जिल्'ाचा कारभार सांभाळता येतोय का, तुम्ही काय करता, ते आता बाहेर काढतो, असे सुनावले.
‘प्रदूषण नियंत्रण’चे अधिकारी पळाले
By admin | Updated: February 24, 2015 00:56 IST