याप्रकरणी मनोज किसन जाधव (रा. गोपाळ वसाहत, यशवंतनगर) असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.फिर्याद पालिकेच्या कनिष्ठ अभियंता सुप्रिया गाडेकर यांनी दिली.
पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार: पेठवडगाव येथील गोपाळ वसाहतीत पालिकेने नागरिकांच्या सेवेसाठी तीन इंची जलवाहिनी टाकण्यात आली आहे.यावर जाधव याने बेकायदेशीर व अनधिकृत कनेक्शन रस्ता खोदाई करून परस्पर जोडणी केली होती. याबाबत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले होते. हा प्रकार फिटर गुराप्पा शिंगे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी विभागप्रमुख गाडेकर, शिवाजी सलगर यांना माहिती दिली. त्यांनी पालिकेच्या संमतीशिवाय पाणी कनेक्शन घेऊन ३ हजार ५८० रुपयांचे पाणी वापरले. तसेच इतर नुकसान ५ हजार ६०० रुपयांचे केल्याचे म्हटले आहे. तपास पोलीस नाईक अमरसिंह पावरा, हवालदार बाबासाहेब दुकाने करीत आहेत.