शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ नावाचा महासागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 01:02 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एरव्ही दत्तदर्शनासाठी नृसिंहवाडीला जाण्याची ओढ अनेकांना असते. वाडीची दोन-चार किलो वांगी ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एरव्ही दत्तदर्शनासाठी नृसिंहवाडीला जाण्याची ओढ अनेकांना असते. वाडीची दोन-चार किलो वांगी घेतल्याशिवाय आणि कुरुंदवाडच्या बासुंदीची चव चाखल्याशिवाय भाविक, पर्यटक इथून बाहेर पडतच नाहीत. त्याच नृसिंहवाडी, कुरुंदवाडसह २५ हून अधिक गावांना आता कृष्णा-पंचगंगेनं अशी काही मगरमिठी मारली आहे की ती सुटता सुटेनाशी झाली आहे. शेकडो किलोमीटर पाहावं तिकडं पाणीच पाणी. शिरोळ नावाचा समुद्रच निर्माण झाल्याजोगी ही परिस्थिती.कोल्हापूरजवळच्या आंबेवाडी, चिखलीमधील परिस्थिती थोडी नियंत्रणात आली आहे, असे म्हणत असतानाच शिरोळ तालुक्यातील पुराचा पाण्याचा वेढा पडलेल्या गावांची संख्या वाढू लागली. म्हणूनच रविवारी दिवसभर शिरोळ तालुक्याचा दौरा केला तर महापुराने उडविलेली हजारो ग्रामस्थांची दैना पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात जोरात पाऊस कोसळू लागला. धरणे भरली, विसर्ग सुरू झाले. जुलै अखेरीला मात्र पुन्हा पूर येण्याची चिन्हे दिसू लागली आणि तो तसा आलाच. तो आला तो इतक्या धडाक्याने आला की अंगावरच्या कपड्यांनिशी अनेकांवर बाहेर पडण्याची वेळ आली.गोठ्यातील जनावरं सोडायची की बांधूनच ठेवायची हेही कळेना.जेवढं काही हाताला लागेल ते घेऊन, पोराबाळांना घेऊन आलेल्या बोटीतून बाहेर पडण्यासाठी अनेकांची धांदल उडाली. ज्यांना आत्मविश्वास होता की २००५ चा महापूर आम्ही बघितलाय, त्यात काय होतंय, असं म्हणणाऱ्यांना मग व्हॉट्स अ‍ॅपवरून जिल्हा प्रशासनाला मेसेज पाठवायची वेळ आली.तोपर्यंत पाणी वाढलं. घरं पाण्याखाली गेली. गावातील दोन-तीन मजली घरांचा आसरा घ्यावा लागला. जनावरेही टेरेसवर नेऊन बांधावी लागली. त्यांच्या धारा काढायलाही माणसं नाहीत, अशी अवस्था. ज्यांना शक्य होतं त्यांनी आपल्यासमवेत जनावरंही छावणीत आणली आणि आता प्रतीक्षा पाणीपातळी कमी होण्याची आहे. छावण्यांमध्ये जेवणाची सोय आहे. चहापाणी आहे. अनेकजणांचा मदतीचा हात आहे. मात्र प्रश्न आहे तो परत घरी गेल्यावरचा. नेमकं कुठून सुरुवात करायची, हे कळेनासं होणार आहे.