शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने ऊसतोड मजुरांचे हाल

By admin | Updated: November 17, 2016 00:36 IST

निवाऱ्यासाठी शाळा, मंदिरांचा आधार : संसारोपयोगी साहित्याचे नुकसान; रात्र जागून काढली

जयसिंगपूर/ दानोळी : मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसात दानोळी, कवठेसार, उदगाव, चिंचवाड, कुरुंदवाड, हेरवाड, तेरवाड, कोथळीसह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने ऊसतोड कामगारांच्या झोपड्यांत पाणी शिरले. या परिसरात काळी जमीन असल्याने ऊसतोड मजुरांना रात्रभर जागावे लागले. मात्र, मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने शिरोळ तालुक्यातील ऊसतोड मजुरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये ऊसतोड मजुरांच्या झोपडी परिसरात पावसाचे पाणी शिरून धान्याची पोती, संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ऊसतोड मजुरांनी ट्रॅक्टरच्या खाली बसून रात्र घालविली. तसेच जवळपास असलेल्या शाळा, मंदिरांत निवाऱ्यासाठी आधार घेतला होता. तुरंबे : राधानगरी तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेली पिके, जनावरांची वैरण, गुऱ्हाळघरे आणि ऊसतोड मजुरांचे मोठे नुकसान झाले. रब्बी पिके आणि ऊसशेतीला हा पाऊस काहीसा दिलासा देणारा आहे. काही ठिकाणी वीज पडून झाडे उन्मळून पडली, तर वीज दाब वाढल्याने इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाली.राधानगरी तालुक्यात काल रात्री वीज-वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे काही लोकांचे नुकसान झाले, तर काही शेतकऱ्यांना पावसाचा फायदा झाला. अचानक आलेल्या या पावसाने साऱ्यांचीच तारांबळ उडाली.परराज्यातून ऊस तोडणी आणि मजुरीसाठी आलेले मजूर झोपडी बांधून राहिलेले होते. अचानक झालेल्या वादळ-वाऱ्याच्या पावसाने झोपड्यांच्या वर घातलेले कागद उडाले. त्यांचे संसारोपयोगी साहित्य भिजल्याने नुकसान झाले. सावरवाडी : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवारी रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे हवेतील उष्मा कमी झाला. तुरळक स्वरूपात पडलेल्या पावसामुळे ऊसतोड मजुरांची तारांबळ उडाली.गेल्या आठवड्यापासून हवेत उष्मा वाढलेला होता. थंडीचे प्रमाण कमी झाले. अवकाळी पावसामुळे गोवऱ्या, विटा बनविणाऱ्या व्यावसायिकांचे नुकसान झाले. ऊस व इतर पिकांना हा पाऊस वरदान ठरला. गुऱ्हाळ व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली होती.शिरगाव : राधानगरी तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट झाली. अनेकांचे भात, नाचणा, भुईमूग शेंगा भिजून चिंब झाल्या, तर ऊसपीक पार कोलमडून पडले. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सायंकाळी विजांच्या कडकडाटासह शिरगाव व परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अनेक ठिकाणी गाड्या घसरून किरकोळ अपघात घडले. या पावसाने ऊसपीक काही ठिकाणी पूर्णपणे कोलमडून पडले आहे. शासनाने ताबडतोब या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.झोपडीत पाणीऊसतोड मजुरांच्या झोपडी परिसरात पावसाचे पाणी शिरून धान्याची पोती, संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. अनेकांनी ट्रॅक्टरच्या खाली बसून रात्र घालविली. तसेच जवळपास असलेल्या शाळा, मंदिरांत निवाऱ्यासाठी आधार घेतला.