शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘सिग्नल’ला बसथांब्यांचा अडथळा

By admin | Updated: May 20, 2017 00:33 IST

वाहतूक कोंडी : शहरातील सात ठिकाणचे बसथांबे अन्यत्र हलविण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विस्कळीत वाहतूक व्यवस्था, अरुंद रस्ते आणि वाढत्या वाहनांमुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यात परत वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांची संख्या जास्त आहे. वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरातील बंद असलेले काही सिग्नल सुरू करण्यात आले. मात्र, यापैकी काही सिग्नलजवळच बसथांबे असल्याने हेच बसथांबे आता वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शहरातील अनेक वर्षे बंद असलेले काही सिग्नल पूर्ववत सुरू करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीस काही प्रमाणात शिस्त लागत आहेत. मात्र, काही सिग्नलजवळच के.एम.टी., एस.टी.चे बसथांबे आहेत. या ठिकाणी एकाच वेळी एस.टी., के.एम.टी. व रिक्षा थांबत असल्याने सिग्नल सुटल्यानंतर वाहतुकीची कोंडी होत आहे. या बसथांब्यांजवळ आजूबाजूलाच प्रवासी व रिक्षांची गर्दी होते. काहीवेळाला रस्त्याच्या मध्यभागीच के.एम.टी. व एस. टी. थांबत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा होतो. या प्रकारामुळे वाहनधारक व एस.टी., केएमटी, रिक्षाचालकांच्यात नेहमीच वाद होत आहेत. बसथांबे सिग्नलपासून काही अंतर पुढे किंवा मागे हलवावेत, अशी वाहनधारकांमधून मागणी होत आहे.वादाचे प्रसंग...सिग्नलजवळ असलेल्या बसथांब्यांवर के.एम.टी., एस.टी., रिक्षा हे प्रवासी घेण्यासाठी थांबतात. मात्र, त्याचवेळी सिग्नल सुटल्याने प्रत्येक वाहनधारकांना पुढे जाण्याची गडबड असते. त्यामुळे हे बसथांबे आता वाहतुकीस अडथळा बनताहेत. त्यामध्ये दुसऱ्या बाजूचा सिग्नल सुटल्याने पुन्हा वाहतुकीची मोठी कोंडी होते. अनेकवेळा त्यामुळे वाहनधारकांमध्ये वाद होतात. तसेच प्रवासी के.एम.टी. किंवा एस.टी. बस पकडण्यासाठी गाडीमागे धावत असतात. यावेळी अपघात होण्याची शक्यता आहे.सिग्नलजवळ वाहतुकीस अडथळे होणारे के.एम.टी. व एस.टी.चे बसथांबे अन्यत्र स्थलांतरित करावे, असे पत्र वाहतूक शाखेच्यावतीने संबंधित विभागास दिले आहे. यासह काही ठिकाणी बसथांबे स्थलांतरित करणे शक्य नाही. त्या ठिकाणी एका बाजूला बस, के.एम.टी. थांबवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे.- अशोक धुमाळ, वाहतूक पोलीस निरीक्षक येथील बसथांबे हलविण्याची गरजशहरातील माळकर तिकटी, व्हीनस कॉर्नर, कावळा नाका, सायबर चौक, माऊली चौकजवळील सिग्नलजवळच के.एम.टी. बसथांबे आहेत. या ठिकाणी के.एम.टी.सह रिक्षा नेहमी लागलेल्या असतात. यासह टाऊन हॉल बागव लक्ष्मीपुरी कोंडा ओळ येथे एस.टी. बसेस थांबतात. या ठिकाणी असणारे प्रवासी थांबे हलविण्याची गरज आहे.