शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महाडिक, खवरे यांच्या अर्जावर आक्षेप

By admin | Updated: March 25, 2015 01:18 IST

राजाराम कारखाना निवडणूक : तणावपूर्ण वातावरण; १६७ अर्ज पात्र, १८ अपात्र

कसबा बावडा : ‘राजाराम’ साखर कारखाना निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १८८ उमेदवारी अर्जांची आज, मंगळवारी छाननी झाली. यामध्ये १७६ अर्ज पात्र, १८ अर्ज अपात्र, तर आमदार महादेवराव महाडिक, शशिकांत खवरे, शिवाजी शामराव पाटील या तीन आक्षेप घेतलेल्या अर्जांचा निकाल राखीव ठेवला आहे. आज, बुधवारी याबाबत निर्णय देण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी सांगितले. दोन्ही गटाकडून अर्जांवर आक्षेप घेतल्याने छाननीच्या ठिकाणी वातावरण तणावपूर्ण बनले होते.रमणमळा येथील बहुउद्देशीय इमारतीमधील कार्यालयात निवडणूक अधिकारी संजय पवार यांच्यासमोर सकाळी ११ वाजता प्राप्त १८८ अर्जांच्या छाननीला सुरुवात झाली. यामध्ये विविध कारणांनी १८ अर्ज अपात्र ठरले. संस्था गट व उत्पादक सभासद प्रतिनिधी गटातून आलेल्या आमदार महादेवराव महाडिक यांच्या अर्जावर कारखान्याचे माजी चेअरमन विश्वास नेजदार तसेच विद्यानंद जामदार यांनी आक्षेप घेतला. आमदार महाडिक हे कोल्हापूर अर्बन बँकेला एका कर्जदाराला जामीन आहेत आणि हे कर्ज थकले आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करावा, अशी मागणी केली. मात्र, सदरचे कर्ज भरले असल्याचे वकिलांकडून यावेळी महाडिक यांच्याकडून सांगण्यात आले. या हरकतीमुळे छाननी ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण बनले.शिरोलीच्या शशिकांत खवरे व शिवाजी पाटील यांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आला. कारखान्याला पाच वर्षांत तीनवेळा ऊस न घातल्याचा त्यांच्यावर आक्षेप आहे. याशिवाय अन्य विविध गटांतील काही उमेदवारांचे अर्ज विविध कारणांनी अवैध ठरविण्यात आले. मात्र, खवरे यांनी आपण उसाचा कारखान्याला करार केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)