शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

के.पीं.विरोधात मोट

By admin | Updated: August 13, 2014 23:32 IST

कॉँग्रेस कार्यकर्ते आक्रमक : विधानसभेत पराभव करण्याचा निर्धार

कोल्हापूर : राधानगरी, भुदरगड तालुक्यांत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आतापर्यंत ज्यांनी गाडण्याचे काम केले त्या आमदार के. पी. पाटील यांना आधी गाडण्याचे काम आपण सगळेजण मिळून करुया आणि नंतर कोण आमदार व्हायचे ते ठरवूया, असा पराकोटीचा निर्धार राधानगरी, भुदरगड तालुक्यांतील कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी आज, बुधवारी येथे झालेल्या मेळाव्यात केला. कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांच्या समोरील अडचणी आता आणखी बिकट झाल्या आहेत.  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका काय असावी, यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी राधानगरी, भुदरगड तालुक्यांतील कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आज, बुधवारी दुपारी गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील सभागृहात मेळावा आयोजित केला होता. मेळाव्याला दोन्ही तालुक्यांतून किमान अडीचशे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी दूध संघाचे संचालक अरुणकुमार डोंगळे यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला आणि कार्यकर्त्यांनी आपली भूमिका अगदी स्पष्टपणे मांडावी, अशी विनंती केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षावर घणाघाती टीका केली. गेल्या वीस वर्षांत राधानगरी, भुदरगड तालुक्यांतून कॉँग्रेस हद्दपार झाली असून, कार्यकर्ते मृतावस्थेत असल्यासारखी परिस्थिती आहे. कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळत प्रत्येकवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसला मदत करायची आणि निवडणुका जिंकल्या की कॉँग्रेस कार्यकर्त्यांना गाडायचे काम करायचे ही निती राष्ट्रवादीची राहिली आहे. त्यामुळे आता वेळ आलीच तर आधी त्यांना गाडण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करुया, अशा संतप्त भावना यावेळी व्यक्त झाल्या.राष्ट्रवादी हा आपला खरा शत्रू आहे. तरीही आम्ही के. पीं.ना विजयी करत आलो; पण त्यांनी आमची कामे केली नाहीत. यामुळे कॉँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होऊ लागले आहे. म्हणूनच त्यांची यापुढे फार भीडभाड ठेऊ नये. आपण सगळे आधी एक होऊन आपली एकी शेवटपर्यंत कायम ठेवली पाहिजे. राधानगरी तालुक्यातील पाच नेत्यांनी आधी एकत्र बसून पुढे कोणी निवडणूक लढवायची हे ठरवा. कार्यकर्ते त्या निर्णयावर ठाम राहून काम करतील, असा विश्वासही काहींनी दिला. मेळाव्याला तालुक्यातील कॉँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. अरुणकुमार डोंगळे, हिंदुराव चौगुले, उदयसिंह पाटील कौलवकर, पी. डी. धुंदरे, विजयसिंंह मोरे, नंदकुमार सूर्यवंशी, सदाशिव चरापले, अभिजित तायशेटे, नंदकिशोर सूर्यवंशी, सुभाष नाना पाटील, सुधाकर साळोखे, डी. एस. पाटील, जगदीश लिंग्रस, रमेश वारके, आदींनी मेळाव्याचे संयोजन केले होते.