शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘ओबीसीं’ना संसदेत बोलू दिले जात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:55 IST

वामन मेश्राम : भारत मुक्ती मोर्चाचे बारा बलुतेदार संमेलन

कोल्हापूर : ‘ओबीसी’ लोकप्रतिनिधींना आपल्या जातीच्या प्रश्नावर संसदेत बोलू दिले जात नाही, त्यांचे राजकीय पक्ष व व्यवस्था हे त्यांना करूदेत नाही, असा जोरदार आरोप भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे केला.‘भारत मुक्ती मोर्चा’तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या समारोप कार्यक्रमांतर्गत दसरा चौक मैदानावर बारा बलुतेदार जातींचे राज्यस्तरीय संमेलन आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण हेंद्रे, डॉ. सूरज पवार, डॉ. संदीप पाटील, अ‍ॅड. नीता मगदूम, बबन रानगे, बसवंत पाटील, केरबा सुतार, विश्वास सुतार, राजेंद्र ढवळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.वामन मेश्राम म्हणाले, बारा बलुतेदार फक्त महाराष्ट्रात नाही तर ते देशभरात ‘जजमानी’ या नावाने परिचित आहेत. या बलुतेदारांचे अशा स्वरूपाचे संमेलन भरविण्यामागील उद्देश म्हणजे या ८५ टक्केलोकांसाठी सोशल नेटवर्किंगचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून सहा हजार जातींच्या लोकांना जागे करण्याचे काम करणे, त्यानंतर त्यांना जोडणे, त्यांच्यात शक्ती निर्माण करणे, या शक्तींचा संचय करणे, या संचयित शक्तीचा प्रयोग व उपयोग करणे अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असणार आहे.ते पुढे म्हणाले, ओबीसी तसेच भटक्या विमुक्त जातींचे नेतृत्व करणाऱ्यांनाच संविधान नीट समजलेले नाही. कारण या जातींमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी या जातींच्या प्रश्नांवर संसदेत अथवा विधिमंडळात कधीही बोलताना दिसत नाहीत. जर ते बोलत नसतील तर ते या जातीचे प्रतिनिधी कसले? त्यांना काय चाटायचे आहे? तसेच ओबीसी जातीच्या लोकप्रतिनिधींना संसदेत बोलूही दिले जात नाही. त्यांना रोखले जाते. यामागे त्यांचा पक्ष व व्यवस्थेचा दबाव कारणीभूत असतो. बहुदा त्यांना संविधानाने दिलेल्या बोलण्याच्या मौलिक अधिकाराची जाणीव नसावी.डॉ. हेंद्रे म्हणाले, कठोर परिश्रम व शिक्षण याशिवाय आपल्याला पर्याय नाही; परंतु ते करणे आपल्या हातात आहे. बबन रानगे म्हणाले, बारा बलुतेदारांमध्ये नेतृत्व निर्माण करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी शैक्षणिक वसतिगृहे स्थापन केली. यावेळी विश्वास सुतार, बी. डी. सुतार, बसवंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)