शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून नूलमध्ये वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 01:03 IST

गडहिंग्लज / नूल : गावातील महिलेशी असलेले अनैतिक संबंध आणि घरात नेहमी भांडण करीत असल्याच्या कारणावरून बांबूच्या काठीने जबर ...

गडहिंग्लज / नूल : गावातील महिलेशी असलेले अनैतिक संबंध आणि घरात नेहमी भांडण करीत असल्याच्या कारणावरून बांबूच्या काठीने जबर मारहाण करून मुलाने वडिलांचा खून केला. आप्पासाहेब बाबू देसाई (वय ५८, रा. नूल, ता. गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा सोमगोंडा आप्पासाहेब देसाई (३०) आणि मेहुणा बाबासाहेब भीमगोंडा पाटील (४८, रा. मुगळी, ता. गडहिंग्लज) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत ग्रामस्थ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, नूल येथील विठ्ठल मंदिरानजीक राहणाऱ्या आप्पासाहेब देसाई यांचे गावातीलच एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. त्या कारणावरून घरात वारंवार भांडण होत असे.मृत आप्पासाहेब यांचा विवाहित मुलगा सोमगोंडा हा बेळगाव येथील एका खासगी कंपनीत नोकरीस असून, गर्भवती असलेली त्याची पत्नी माहेरी संकेश्वर येथे आहे. दोन दिवसांपूर्वीच आप्पासाहेब यांचे पत्नीबरोबर कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे त्या गडहिंग्लज येथील आपल्या विवाहित मुलीकडे राहायला आल्या होत्या.दरम्यान, रविवारी (दि. १८) सायंकाळी सोमगोंडा गावी आला होता. त्यावेळी साडेसातच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यात बाप-लेकांत भांडण झाले. त्यावेळी चिडलेल्या सोमगोंडाने गोठ्यातील बांबूच्या काठीने वडिलांच्या डोक्यात मारहाण केली. घाव वर्मी बसल्याने त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाली. त्याने मुगळीहून मामा बाबासाहेब पाटील यांना बोलवून घेतले आणि दुचाकीवरून वडिलांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले.उपजिल्हा रुग्णालयातील उपचारानंतर खासगी दवाखान्यात नेत असताना आप्पासाहेब याचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी मृतदेह गावी नूलला नेला. सोमवारी (दि. १९) सकाळी अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस, उपनिरीक्षक विश्वास कुरणे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहासह आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस पाटील परशराम सरनाईक यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे.—————————निनावी फोनमुळे खुनाचा उलगडासोमवार सकाळी अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच नूल येथे घडलेल्या प्रकाराची माहिती निनावी फोनमुळे पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी खाक्या दाखविताच आरोपींनी खुनाची कबुली दिली. त्यानंतर आरोपी, मृतदेह व तिरडीसह अंत्यसंस्काराचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले.संशयिताकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नआपल्याकडून झालेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याचे माहीत असूनही हृदयविकाराने त्यांचे निधन झाल्याचे भासवत मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न सोमगोंडा याने केला. त्याला मामा बाबासाहेब याने मदत केली. त्यामुळे खून करून पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.