कोल्हापूर : गेल्या चार महिन्यांतील सर्वांत कमी कोरोना नवीन रुग्णसंख्या शुक्रवारी नोंदविण्यात आली. नव्याने ८२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ११४० रुग्णांवर उपचार सुरू असून, गेल्या २४ तासांत १०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, गगनबावडा या चार तालुक्यांत आणि शिरोळ, हुपरी, मलकापूर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. कोल्हापूर शहरात १९, हातकणंगले तालुक्यात ११, तर करवीर तालुक्यात १० रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. चाचण्यांची संख्या १५ हजारांवरून सहा हजारांपर्यंत खाली आली आहे. जिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये कोल्हापूर शहरातील दोघांचा समावेश आहे. बांबवडे, ता. शाहूवाडी, गडमुडशिंगी, ता. करवीर आणि शहापूर इचलकरंजी येथील तिघांचा मृत्यू झाला आहे.