शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

...आता दहाच्या आत कार्यालयात

By admin | Updated: November 25, 2014 00:01 IST

कारवाईवर पदाधिकारी ठाम : जिल्हा परिषदेतील बायोमेट्रिकमधील सावळा गोंधळ उघड

कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी लेटकमर्सना चांगलाच दणका दिल्यानंतर आज, सोमवारी सर्वच कर्मचारी कार्यालयात दहाच्या आत उपस्थित राहिले. दरम्यान, प्रशासनाने एकूण ३६५ कर्मचारी असल्याची माहिती दिली होती. मात्र, बायोमेट्रिकमध्ये ५५२ कर्मचारी असल्याचे उघड झाल्यामुळे सामान्य प्रशासनातील गलथान कारभार समोर आला आहे. लेटकमर्स आणि आंदोलकांवर कारवाई झालीच पाहिजे, यासाठी उपाध्यक्ष खोत पाठपुरावा करीत आहेत. यामुळे कर्मचारी विरुद्ध पदाधिकारी, असा वाद चिघळला आहे.शुक्रवारी (दि. २१) उपाध्यक्ष खोत यांनी सकाळी दहा वाजता येऊन कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोखले होते. त्या दिवशी सामान्य प्रशासनाकडून एकूण ३६५ कर्मचाऱ्यांपैकी ११५ कर्मचारी उशिरा आल्याचे सांगण्यात आले. यानुसार बायोमेट्रिकमध्ये ३६५ कर्मचारी असणे आवश्यक आहे. परंतु, आज उपाध्यक्षांनी माहिती घेतल्यानंतर बायोमेट्रिकमध्ये ५५२ कर्मचाऱ्यांची नोंद असल्याचे स्पष्ट झाले. संघटनेतील काही कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येताना ‘थंब’ दिले आहे. मात्र, जाताना ‘थंब’ केले नसल्याचे उघड झाले आहे. (प्रतिनिधी)कर्मचारी, पदाधिकारी यांच्यातील वाद मिटवण्यासाठी कक्षामध्ये बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लेटकमर्सबाबत अधिकारी काय भूमिका घेतात, ते पाहूया.- विमल पाटील,अध्यक्षा-जिल्हा परिषद. सामान्य प्रशासन ३६५ कर्मचारी असल्याचे सांगत होते. मात्र, आज माहिती घेतल्यानंतर बायोमेट्रिकमध्ये ५५२ कर्मचारी असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे बायोमेट्रिकला इतक्या मोठ्या संख्येने कर्मचारी वाढले कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचबरोबर लेटकमर्स, आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी आग्रही आहे.- शशिकांत खोत, उपाध्यक्ष