शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष्य पॅरिस ऑलिम्पिक : राही सरनोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 19:29 IST

Rahi Sarnobat Olympics 2020 kolhapur : महिन्याच्या विश्रांतीनंतर २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीला लागणार असून, नक्कीच देशासाठी पदक जिंकेन, असा निर्धार कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने केला. टोकीओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर प्रथमच घरी परतलेल्या राहीने बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ठळक मुद्देआता लक्ष्य पॅरिस ऑलिम्पिक : राही सरनोबतऑलिम्पिक स्पर्धेनंतर घरी परतलेल्या राहीने साधला संवाद

कोल्हापूर : टोकीओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी झाली. तरीसुद्धा या स्पर्धेतून मला सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या. या अनुभवावरच मी एक महिन्याच्या विश्रांतीनंतर २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीला लागणार असून, नक्कीच देशासाठी पदक जिंकेन, असा निर्धार कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने केला. टोकीओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर प्रथमच घरी परतलेल्या राहीने बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.कोरोना महामारीमुळे स्पर्धा एक वर्षांनी पुढे ढकलल्याने नियोजित वेळापत्रक व तयारीचा आराखडा चुकला. आराखड्यानुसार २०२०मध्ये स्पर्धा झाली असती तरी नक्कीच निकाल वेगळा लागला असता. कोरोना काळातही ही स्पर्धा आम्हाला खेळायला मिळाली. त्यात पाच शॉटस् खराब लागले. त्याचा परिणाम इतक्या वर्षांच्या मेहनतीवर झाला. तरीसुद्धा मी या स्पर्धेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहते. हा अनुभव मला नक्कीच २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी उपयोगी पडणार आहे, असा आत्मविश्वास तिने दाखवला. एक महिन्यांच्या विश्रांतीनंतर मी पुन्हा सरावाला सुरुवात करणार आहे.जर्मन प्रशिक्षकाची कमतरता जाणवलीदोन वर्षांपूर्वी जर्मनीची ऑलिम्पिक सुवर्ण विजेती प्रशिक्षक मुखबयार हिच्यासोबत माझा करार होता. हा करार नेमका टोकीओ ऑलिम्पिक २०२०पर्यंतच होता. त्यानंतर मला समशेरसिंग यांच्याकडून प्रशिक्षण घ्यावे लागले. तिच्यामुळेच मी आतापर्यंत विश्व नेमबाजी व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चमकदार कामगिरी केली. तिची उणीव मला टोकीओ ऑलिम्पिक स्पर्धेत जाणवली.नोकरीपेक्षा खेळाला प्राधान्यराज्य शासनाने दिलेली नोकरीही महत्त्वाची आहे. पण आगामी काळात पॅरिस ऑलिम्पिक मला महत्त्वाचे वाटते. एकावेळी दोन्हीकडे लक्ष देऊ शकत नाही. राज्य शासनाने मला पाठबळ दिले आहे. तरीसुद्धा मी याबाबतचा अर्ज दिला आहे. मी सरावावर भर देणार असून, येत्या सहा महिन्यांत केवळ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होईन, असा अर्ज शासनाकडे सादर करणार आहे.विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण यशाला वाचनाचा आधारक्रोएशियामध्ये महिनाभरापूर्वी झालेल्या जागतिक विश्व स्पर्धेत मला सुवर्ण कामगिरी करता आली. त्यात दोन सुवर्ण, एका कांस्य पदकाची कमाई केली. यावेळी वेपन ठेवण्याच्या बॅगेत पु. ल. देशपांडे, सुधा मूर्ती यांची हलकीफुलकी पुस्तके ठेवली होती. ती वाचत होते. मला वाचनामुळे मोठा आधार मिळतो, अशीही प्रांजळ कबुली तिने दिली. 

टॅग्स :Rahi Sarnobatराही सरनोबतOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021kolhapurकोल्हापूर