शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आता एसटीही होणार कॅशलेस

By admin | Updated: April 10, 2017 00:48 IST

बुकिंगसाठी स्वाइप मशीन : कोल्हापूर विभागाच्या ३३१ बसवर ई टॅग

कोल्हापूर : नोटाबंदीनंतर संपूर्ण देशभरात कॅशलेस व्यवहारसाठी सरकार प्रयत्न करत आहे. काळाची हीच गरज ओळखून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागानेही कॅशलेस व्यवहारासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. टोल भरण्यासाठी कोल्हापूर विभागातील ३३१ एस.टी.च्या बसवर ई-टॅग प्रणाली लावण्यात आली आहे, तर आरक्षणासाठी स्वाइप मशिन्सचा वापर केला जात आहे. सरकारने ५०० व १००० जुन्या नोटांवरील बंदीनंतर कॅशलेसचा पर्याय सार्वजनिक वाहतूक सेवांकडून निवडण्यात आला आहे. एस. टी. महामंडळाकडूनही कॅशलेसचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. टोलनाक्यांवर टोल भरताना प्रवाशांचा वेळ वाया जातो. त्यावर पर्याय म्हणून एस. टी. बसवर ‘ई-टॅग’ बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे टोलची रक्कम थेट बँक खात्यातूनच वजा होतेच पण १० टक्के सूट एस. टी. बसना मिळत आहे. ई-टॅग गाड्यांसाठी प्रत्येक टोलनाक्यांवर वेगळ्या बूथची व्यवस्था केली आहे. याआधीच महामंडळाने आरक्षणासाठी अँड्रॉईड मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहे तर विमान, रेल्वेच्या रिझर्व्हेशन सुविधेप्रमाणे एस.टी.च्या प्रवाशांनाही आॅनलाईन आरक्षणाची सोय आहे तसेच, एसएमएसद्वारे आरक्षण आदी सोयी-सुविधा एस.टी. महामंडळाकडून पुरविल्या जात असताना विविध आगारांतील तिकीट खिडक्यांवर आरक्षण करताना रोखीने व्यवहार केले जात होते. त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून कर्मचाऱ्यांसमवेत प्रवाशांचे वादाचे प्रसंग उद्भवत होते. नोटाबंदीच्या काळात आरक्षणादरम्यान प्रवाशांचे होणारे हाल पाहता महामंडळाने संपूर्ण राज्यातील तिकीट बुकिंग खिडक्यांवर स्वाईप मशीन वापरण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कोल्हापूर विभागाने मध्यवर्ती बसस्थानक व संभाजीनगर येथे तिकीट बुकिंग खिडक्यांवर स्वाइप मशिन्स बसविली आहेत. तिकीट खिडक्यांवर डेबिट, क्रेडिट कार्ड स्वाईप करून तिकिटांचे शुल्क भरता येणार आहे तसेच विद्यार्थी पासची रक्कम ही स्वाइप मशीनने भरता येणार आहे. (प्रतिनिधी)